मुंबई : हल्ली मोबाईल डेटावर जास्त खर्च करण्यापेक्षा वायफाय वापरण्याकडे लोकांचा कल अधिक आहे. बऱ्याचदा आपल्या फोनमध्ये वायफाय नीट चालत नाही. कधीकधी रेंजचा त्रास असतो कधीतरी आपला फोन सपोर्ट करत नाही. काहीवेळा तांत्रिक कारणही असू शकतं. मात्र आज आम्ही तुम्हाला रडरडत चालणाऱ्या वायफायला काही सोप्या टिप्स वापरून कसं झटपट चालवायचं ते सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर कधी वायफाय नीट निरखून पाहिलं असेल तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हं असतात त्याला निळा, हिरवा किंवा लाल दिवा लागतो. तो जर चांगल्या रेंजमध्ये असेल तर हिरवा दिवा असतो. तो दिवा लूकलूकत राहातो किंवा स्थिर राहातो. जेव्हा वायफाय काम करायचं बंद होतं तेव्हा हे दिवे बंद होतात. 


जेव्हा लाल दिवा लागतो तेव्हा हे समजून घ्यायचं की पूर्णपणे इंटरनेट कनेक्शन बंद झालं आहे. त्यामुळे तुम्हाला नेटवर काम करण्यात अडचण येत आहे. राऊटर काम करणं बंद करतो तेव्हा लाल दिवा लागतो. कधीकधी कुठेतरी कनेक्शनचा त्रास असतो त्यामुळे अशा गोष्टी होतात. 


काय कराल उपाय? 
अशा काही गोष्टी झाल्याच तर पहिल्यांदा तुम्ही रिचार्ज संपला आहे का ते तपासा. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे 5 मिनिटांसाठी वायफाय बंद करा आणि पुन्हा सुरू करा. या गोष्टी जर काम करत नसतील तर तिसरी आणि महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही वायर काढून पुन्हा जोडा आणि त्यानंतर 2 मिनिटांनी पुन्हा वायफाय सुरू करा. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचं गेलेल्या वायफायची रेंज परत मिळवू शकता.