मुंबई : एक नवी इलेक्ट्रिक बाईक भारतामध्ये लॉन्च झाली आहे. ही नवी बाईक आहे हार्ले डेव्हिडसनची. हारले डेव्हिडसन म्हणजे बघता क्षणी प्रेमात पाडणारी बाईक. नुकतीच ही इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्यात आली आहे. १५६ किलोवॅट लिथियम बॅटरीवर ही बाईक धावते. एकदा चार्ज केली की २२५ किलोमीटर ही बाईक धावू शकणार आहे. अवघ्या तीन सेकंदांत ही बाईक शंभरपर्यंतचा वेग गाठू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हारलेची इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे चार्ज होणारी आहे. ११ ते १३ तासात, पण तुम्ही जर फास्ट चार्जिंगला लावलीत, तर चाळीस मिनिटांत बाईक चार्ज होते. सध्या ही बाईक रोड, स्पोर्ट, रेन, रेंज आणि २ कस्टमाईज अशा ७ मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. भारतामध्ये हार्ले डेव्हिडसनची किंमत ५० लाखांपर्यंत आहे.



सध्या काळ्या, पिवळ्या आणि केशरी रंगामध्ये ही बाईक उपलब्ध आहे. त्यामुळे हार्लेच्या चाहत्यांनो, तुमच्यासाठी नवी बाईक सज्ज आहे.