मुंबई : तुम्ही तुमची जीन्स पॅंट धुता का ? असा प्रश्न विचारल्यास अनेक मंडळी प्रश्न विचारणाऱ्या मंडळीला वेढ्यात काढतील. पण खरेच तुम्ही जर जीन्सची पॅंट धुत असाल. तर, ते त्वरित बंद करा. हे ऐकून कदाचीत तुम्हाला धक्का बसेल पण असं चक्क लिवाईसचे सीईओ चिप बर्ग यांचे म्हणने आहे. लिवाईस ही जगातील पहिली जीन्स बनवणारी कंपनी आहे. तसेच, लिवाईसला कपड्यांमधला एक सर्वोत्तम आणि उच्च ब्रॉंड मानला जातो. जाणून घ्या काय म्हणतायत लिवाईसचे सीईओ.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

– लिवाईसचे चिप बर्ग म्हणतात आपण आपली जीन्स नाही धुवायला पाहिजे. ते म्हणतात की, मी स्वत:ही जीन्सवर पडलेले डाग टूथब्रशने साफ करतो.


बर्ग नावाच्या या सीईओंचे पूढे म्हणने असे की, जीन्सला वॉशिंगमशीनमध्ये धोन्याची अजीबात गरज नाही. अगदीच अपवादात्मक स्थितीमध्ये जिन्सला वॉशिंगमशीनमध्ये टाकून धुवायला पाहिजे.


– चिप बर्ग यांच्या विधानामगचे सत्य असे की, लिवाईसची जीन्स धुतल्यामुळे तीच्या शानदारपणाला धक्का पोहोचतो. तसेच त्याच्या मटेरियललाही समस्या निर्माण होतात.


दरम्यान, काही अभ्यासकांचे म्हणने असे की, जीन्स धोण्यापूर्वी सहा महिन्यांचा कालावधी घेणे जरूरी आहे. आपण जीन्स जीतका दिवस जास्त वापरला व धुण्याचे टाळाल तितके जास्त दिवस आपली जीन्स टीकेलही आणि छानही दिसेल.


–  जर आपण जीन्स लवकर लवकर धूत असाल तर, तिचा रंग उडण्याची शक्यता असते.
कीटाणूंपासून बचाव होण्यासाठी अनेक जीन्स निर्माता कंपन्याचा सल्ला असतो की, बॅक्टेरियांपासून सुटका मिळविण्यासाठी आपण आपली जिन्स फ्रिजवमध्ये रात्रभर ठेवा. त्यानंतर ती जीन्स उन्सात सुखवा आणि न्यूट्रलाईजर स्प्रे देऊन वॉश करा.


असे केल्याने तुमच्या जीन्सची चकाकी आणि रंग कायम राहिल.