मुंबई : Hero HF Deluxe IBS, या देशातील आघाडीच्या वाहन बनविणारी कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने हीरो एचएफ डीलक्स आयबीएस ही जबरदस्त बाईक बाजारात उतरविली आहे. हिरोची बाईक कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमने (सीबीएस) सुसज्ज आहे. जरी हिरोने इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (आयबीएस)चे नाव दिले असले तरी ही बाईक कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमने सुसज्ज असेल. दिल्लीमध्ये एक्स शोरुम या बाईकची किंमत 49,300 रुपये आहे. 1 एप्रिल 2019 पासून सरकारनच्या नव्या नियमानुसार आणि सुरक्षतता नुसार कंपनीने ही बाईक लॉन्च केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन नियमानुसार 125 सीसी पेक्षा कमी इंजिन वाली बाईक्समध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. शिवाय बाइक (एचएफ डिलक्स) मध्ये 130 एमएम मोठ्या रिअर ड्रम दिले आहेत. याशिवाय फोटोत ही बाईक आधीप्रमाणे दिसत आहे. i3S पावर्ड बाईकमध्ये 9 7.2 सीसी एअरकॉल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर ओएचसी इंजिन देण्यात आले आहे. बाइकचे इंजिन 8,000 आरपीएम वर 8.24 बीएचपीची पॉवर आणि 8,000 आरपीएम 8.05 एनएमची टॉर्क जेनरेट करते.


किक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट दोन्ही पर्याय


बाईकमध्ये किक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट दोन्हीचे पर्याय देण्यात आलेले आहेत. कंपनीचा दावा आहे की, या बाईकमध्ये 88.24 किमी प्रति लीटर मायलेज देण्याची क्षमता आहे. खरे तर बाईक i3S तंत्राने सुसज्ज आहे. याचा अर्थ असा आहे की, आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टम सुसज्ज आहे. ज्यामुळे बाइक अधिक मायलेज देऊ शकेल. बाईक मार्केटमध्ये विना i3S अपटेडनुसार उपलब्ध होईल.


ब्रेकिंग सिस्टम आधीपेक्षा अधिक चांगली करण्यात आली आहे. त्यामुळे कमी वेळेत ही गाडी थांबेल. नवीन हिरो एचएफ डिलक्स आयबीएस ही बाईक पाच रंगात आणि चार ड्यूल रंगात उपलबध्द होईल. यात 'हेवी ग्रे' सह ब्लॅक, काँडी ब्लेजिंग रेड, ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ पर्पल, हेवी ग्रे विथ ग्रीन आदी रंग समाविष्ट आहे.