131 वर्षांची झाली `होल पंच` मशीन
आज डिजिटल युगात अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत.
मुंबई : आज डिजिटल युगात अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी सरकारी ऑफिसमध्ये फाईलमधील कागद एकत्र बांधून ठेवण्यासाठी पंक्चिंग मशीन फायदेशीर ठरतं. ऑफिसप्रमाणेच घराघरात पोहचलेले हे मशीन आता १३१ वर्षांचे झाले आहे.
जर्मन संशोधक फ्रेडरिक सुनेनिकन यांनी याबाबतचे पेटंट मिळवले आहे. 14 नोव्हेंबर1886 साली हे पेटंट मिळवले होते. त्यादिवशीदेखील मंगळवार होता. आज गूगलने या होल पंच (Hole punch)ची आठवण पुन्हा करून दिली आहे.
होल पंच जसे निर्माण करण्यात आले होते तसेच आजही उपलब्ध आहे. त्यामध्ये थोड्या फार प्रमाणात , आकारात बदल झाला आहे.
गूगल डूडलच्या माध्यमातून खूपच हटके स्टाईलने नेटकर्यांना आज होल पंचची पुन्हा आठवण करून देण्यात आली आहे. त्याचा एक खास व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.