मुंबई : अनेक वेळा दुर्लक्ष केल्याने, किंवा उन्हाने, खोटे दागिने घातल्याने मान काळी पडते. मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते, तेव्हा यावर काही घरगुती उपाय केले, तर ही समस्या सोडवता येते.


घरगुती पण महत्वाचे उपाय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता. बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये. अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. 


नारळाच्या तेलाने त्वचेवरील घाण निघून जाते आणि रंध्रे स्वच्छ होतात. या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा. 


हलका लेयर लावून वाळल्यावर पाण्याच्या मदतीने राउंड स्क्रब करत पाण्याने पॅक काढा. यामध्ये मानेवरील मळ निघून जाण्यास मदत होते. आता पॅक लावण्यापूर्वी आधी पॅच टेस्ट करून पहा. हे पॅक हातावर लावून थोड्या वेळ वाट बघा. काही रिऍक्शन होत नसेल तरच हा पॅक मानेवर लावा. 


एक नरम टॉवेल गरम पाण्यातून काढून व्यवस्थित पिळून घ्या. या टॉवेलने मानेच्या जवळपासची जागा रगडून स्वच्छ करून घ्या टॉवेलमधून निघत असलेल्या वाफेने रंध्रे खुलतील. थोड्या वेळाने याठिकाणी मॉईश्चरायजर लावा.


डायबेटीसची सुरूवात तर नाही ना?


यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, घरगुती उपाय केल्यावरही काळा डाग निघत नसेल, तर डॉक्टरांना भेटा, अनेक वेळा डायबेटीसची सुरूवात असताना मान काळी पडण्यास सुरूवात होते, तेव्हा रक्ताची चाचणी करून घेणे देखील फायदेशीर असते.