PHOTO : शोलेमधील अभिनेत्याचा मुलगा तर प्रेम चोप्राचा जावई, अनेक हिटनंतरही चित्रपटापासून लांब, पण ओटीटीवर धुमाकूळ

Entertainment : वयाच्या 21 व्या वर्षी लग्न आणि 26 व्या वर्षी वडील झालेल्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. या चिमुकल्याचा तीन फिल्मी कुटुंबाशी संबंध असून वडिलांपासून काकूपर्यंत सगळे कलाकार आहेत. 

Apr 28, 2024, 10:56 AM IST
1/9

तीन फिल्मी घरण्यााशी संबंध असलेला हा चिमुकला सोशल मीडियापासून आपलं खाजगी आयुष्य कायम दूर ठेवतो. 

2/9

नागपुरातील गुजराती ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्याचं नाव आहे शर्मन जोशी. शोले चित्रपटातील अभिनेता अरविंद जोशी आणि सरिता भोसले यांचा मुलगा आहे. 

3/9

शर्मनची बहीण अभिनेत्री मानस जोशी ही अभिनेता रोहित रॉयची बायको. याचा अर्थ रोहित रॉय हा शर्मनचा जिजाजी आहे.

4/9

तर प्रेम चोप्राची मुलगी प्रेरणा चोप्रा ही शर्मनची बायको असून त्यांना विहान, वर्यान आणि ख्याना जोशी अशी तीन मुलं आहेत. 

5/9

तर अभिनेता विकास भल्ला हा शर्मनच्या बायकोची बहीण पुनीता चोप्राचा नवरा आहे. 

6/9

प्रेरणाला पाहता क्षणी शर्मन तिच्या प्रेमात पडला होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि वर्षभरात दोघांनी 2000 मध्ये लग्न केलं. 

7/9

1999 मध्ये 'गॉडमदर'  या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर 'गोलमाल', 'रंग दे बसंती', '1920 लंडन', 'वजाह तुम हो', 'ढोल', '3 इडियट्स', 'मिशन मंगल', 'गोलमाल रिटर्न्स', 'म्युझिक' या चित्रपटामधील अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं. 

8/9

फेरारी राइड या चित्रपटासाठी शर्मनला 40 ऑडिशन द्यावे लागले होते. चित्रपटापासून लांब असला तरी बारिश या ओटीटीवर पहिल्या वहिल्या सीझन लोकांना आवडला. 

9/9

मीडिया रिपोर्टनुसार शर्मन जोशीकडे 105 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं वृत्त आहे.