HONDA ACTIVE 6G मॉडेल लॉन्च
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने भारतात आपली नवी स्कूटर आणली आहे.
मुंबई : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने भारतात आपली नवी स्कूटर आणली आहे. अँक्टिव्हाचं सहावं वर्जन असून अॅक्टिव्हा 6 G असं हे मॉडेल आहे. ६३ हजार ९१२ रुपये इतकी स्कूटरची किंमत आहे. अपडेटेड इंजिन, ज्यादा मायलेज आणि काही नवे फिचर या स्कूटरमध्ये देण्यात आले आहेत.
या स्कूटर लॉन्च कार्यक्रमावेळी होंडाने ६ जी गेम्स ऑफ सिक्सेस क्रिकेट मॅचचं आयोजन केलं होतं...यावेळी कंपनीचे ब्रँण्ड अँम्बेसेडर असलेले अक्षय कुमार आणि तापसी पन्नू उपस्थित होते...त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय घुगे..