Honda Cars Offer : सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवामुळे आणि येऊ घातलेल्या सणांमुळे Honda कंपनीने आपल्या पाच वेगवेगळ्या कार्सच्या मॉडेल्सवर तगडा डिस्काउंट देत आहे. या सणासुदीच्या हंगामानिमित्त होंडा कार्स इंडियाने आपल्या कारवर सूट जाहीर केली आहे. कंपनीने या सवलतीला नवरात्रोत्सव ऑफर्स (Navratri Offer) असं नाव दिलंय. ही ऑफर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.


Honda City 5th Gen


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होंडा सिटीच्या पाचव्या जनरेशनवर 5,000 रुपयांपर्यंत रोख सूट मिळतीये. याशिवाय, कार एक्सचेंजवर ग्राहकांना होंडा ते होंडा एक्स्चेंज बोनस 5,000 रुपये आणि 7,000 रुपये देखील दिले जात आहेत. याव्यतिरिक्त, कंपनी 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देत आहे.


Honda WR-V


कंपनी Honda WR-V  या कारवर एकूण रु. 27,000 ची सूट देत आहे. कंपनीला या कारसाठी एक्सचेंज बोनस म्हणून 10,000 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. तुम्ही जुन्या Honda WR-V ऐवजी नवीन WR-V खरेदी केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांची सूट मिळेल. होंडा ग्राहकांना लॉयल्टी बोनस म्हणून 5,000 रुपयांची सूट मिळत आहे. 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील असेल. त्याचबरोबर, होंडा टू होंडा कार एक्सचेंजच्या रूपात 7,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस असेल.


Honda Jazz


Honda आपली प्रीमियम हॅचबॅक कार Honda Jazz वर ​​10,000 रुपयांची सूट एक्सचेंज डिस्काउंटच्या रूपात देत आहे. यासोबतच, या कारवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळते आहे. होंडा ग्राहकांना लॉयल्टी बोनस म्हणून 5,000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यासोबतच, होंडा टू होंडा कार बदलणाऱ्या ग्राहकांना 7,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.


Honda City 4th Gen


सप्टेंबर महिन्यासाठी, कंपनी चौथ्या जनरेशनच्या सेडान होंडा सिटी कारवर कोणताही रोख किंवा एक्सचेंज बोनस डिस्काऊंट देत नाहीयो. या कारवर फक्त लॉयल्टी बोनसच्या रूपात 5,000 रुपयांची सूट मिळत आहे.


Honda Amaze


या महिन्यात, Honda च्या आलिशान आणि सर्वाधिक विकल्या जाणार्‍या सेडानवर कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय, कंपनी 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.