Honda Flex Fuel Motorcycles in india: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहून ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. त्याचबरोबर इंधनाच्या इतर पर्यायांचा विचार देखील केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी टोयोटाने देशातील पहिल्या फ्लेक्स-फ्यूल इंजिन कार सादर केली होती. आता या तंत्रज्ञानावर आधारित बाइक बाजारात येणार आहे.  होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडियाने (HMSI) फ्लेक्स-इंधन इंजिन असलेली मोटरसायकल लाँच करण्याची तयारी केलीआहे. येत्या दोन वर्षात नवीन फ्लेक्स-इंधन मोटरसायकल लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. टीव्हीएसच्या फ्लेक्स-इंधन इंजिन Apache RTR 200 Fi E100 नंतर, फ्लेक्स-इंधन इंजिनवर चालणारी मोटरसायकल लाँच करणारी होंडा ही भारतातील दुसरी कंपनी असेल.होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडियाचे सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी दिल्लीतील जैवइंधनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ही घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लेक्स-इंधन इंजिनमुळे वाहन पेट्रोल आणि इथेनॉलवर चालण्यास सक्षम असते. ही बाइक गरजेनुसार पूर्णपणे पेट्रोल किंवा इथेनॉलवर धावू शकते. जापानी कंपनी होंडा  इतर देशांमध्ये फ्लेक्स-इंधन मोटरसायकल विकत आहे. कंपनी भारतात फ्लेक्स-इंधन इंजिनसह प्रवासी मोटरसायकल लाँच करू शकते.


Maruti च्या गाड्यांमध्ये मायलेज वाढवणारं जबरदस्त फीचर, तुम्हाला माहिती आहे का?


"फ्लेक्सी-इंधन मोटरसायकलचे पहिले मॉडेल 2024 च्या अखेरीस लाँच केले जाईल," असं सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी सांगितलं. पहिली फ्लेक्स-इंधन मोटरसायकल म्हणून कोणते मॉडेल वापरले जाईल याबाबत स्पष्टता नाही.