मुंबई : Honda कंपनीने नुकतेच एक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरचे फीचर्स, नवीन स्पोर्टी लूक, इंजिन आणि सर्वांना परवडणारी किंमत ग्राहकांचं खास आकर्षन ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊयात या Honda Dio Sports बद्दल बरचं काही....


Honda Dio Sports स्कूटरचं डिझाइन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नवीन Honda Dio Sports स्कूटरमध्ये  ग्राफिक्स आणि स्पोर्टी रेड रिअर सस्पेंशन आहे. ही स्कूटर डीलक्स प्रकार स्पोर्टी अलॉयजसोबत उपलब्ध आहे. ही स्कूटर ब्लॅकसोबत स्ट्रॉन्टियम सिल्व्हर मेटॅलिक आणि ब्लॅकसह स्पोर्ट्स रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.


Honda Dio Sports Limited Edition चे फीचर्स



स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, इंटिग्रेटेड ड्युअल फंक्शन स्विच, एक्सटर्नल फ्युएल लिड, पासिंग स्विच आणि साइड स्टँड इंडिकेटर यांसारखी फीचर्स आहेत. याशिवाय, स्कूटरला चांगल्या इंधन कार्यक्षमतेसाठी इक्वेलायझर, 3-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन आणि 3-स्टेप इको इंडिकेटरसह कॉम्बी-ब्रेक सिस्टम देखील उपलब्ध आहे.


Honda Dio Sports Limited Edition चं इंजिन



नवीन Dio Sports Limited-Edition मध्ये 110cc, PGM-FI इंजिन आहे. ज्याच एन्हांस्ड स्मार्ट पॉवर (eSP)  येतं. हे इंजिन 8,000rpm वर 7.65bhp ची पॉवर आणि 4,750rpm वर 9Nm चा पीक टॉर्क जनरेट करतं.


Honda Dio Sports Limited Edition ची किंमत



होंडा डिओ स्पोर्ट्स लिमिटेड-एडीशन स्कूटर 68,317 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्याच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 68,317 रुपये आणि डीलक्स व्हेरिएंटची किंमत 73,317 रुपये आहे. या सर्व किंमती दिल्लीतील एक्स- शोरुमच्या आहेत.  ग्राहक त्यांच्या जवळच्या रेड विंग डीलरशिपवर किंवा ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर याबद्दलचे डिटेल्स तपासू शकता.