मुंबई : काही वर्षांपूर्वीपर्यंत चार चाकी गाड्या याच केवळ आलिशान असतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता टेक्नोलॉजी झपाट्याने बदलत आहे. चारचाकींप्रमाणे दुचाकी गाड्यांमध्येही 'लग्झरी बाईक्स'चा ट्रेंड वाढत आहे. जगभराप्रमाणेच भारतातही आजकाल महागड्या आणि लग्झरी बाईक्सची मागणी वेगाने वाढते आहे. परिणामी या क्षेत्रातील स्पर्धा  दिवसेंदिवस तीव्र होत आहे. 


लग्झरी बाईकमधील वाढती स्पर्धा पाहून होंडानेही आता यामध्ये उडी घेतली आहे. होंडाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाईन केलेली गोल्ड विंग नावाची बाईक २४ ऑक्टोबरला सादर केली जाणार आहे.  गोल्ड विंग ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये येत आहे. 
गोल्ड विंग बाईकची वैशिष्ट्यं - : 
 की- लेस इग्निशन,
 हीटेड ग्रीप्स सीट, 
 ऑडिओ फोन कनेक्टीव्हीटी,
 क्रूज कंट्रोल, 
 सॅटेलाईट नेव्हीगेशन, 
 सेमी अॅक्टीव्ह सस्पेंशन हँडल अशी फिचर्स  आहेत. 
 
 बाईकचा पुढचा भाग हलका असल्याचे हँडलींगला ही बाईक अत्यंत सुकर आहे. यामध्ये फ्लॅट सिक्स युनिट इंजिन असून हे इंजिन अपग्रेड करण्याचीही सोय आहे. भारतात ही बाईक कधी येणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच या बाईकची किंमतही गुलदस्त्यामध्ये आहे.