मुंबई : स्मार्टफोन कंपनी ओनरने नवा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन इतर स्मार्टफोन्सना चांगलीच टक्कर देत आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनचे नाव HONOR NOVA 3 आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने चांगले फिचर्स दिले आहेत आणि हा फोन रेडमी नोट ५ ला चांगलीच टक्कर देत आहे. पाहुया काय आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स...


फिचर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात 4जीबी रॅमसोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. कंपनीने यात 16 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 24 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये KIRIN 659 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 3000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. 


किंमत


एक स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे. याची किंमत 18999 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे.