मुंबई : आपण नेहमी यूट्यूबवरील व्हिडीओ हा फक्त मनोरंजनाचा भाग म्हणून पाहतो. तसेच त्या व्हिडीओला पसंती देऊन इतरांना देखील शेअर करण्याचं काम करीत असतो.  पण याच यूट्यूबद्वारे कमाई करता येऊ शकते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? अमेरिकेतील अवघ्या ७ वर्षाच्या मुलाने हे साध्य करुन दाखवलं आहे. फोर्ब्स मासिकाने २०१७ ते २०१८ या दरम्यान यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे की, या यादीत सर्वाधिक कमाई करणारा केवळ ७ वर्षाचा रेयान हा अव्वल स्थानी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेयान याचं 'रेयान टॉय रिव्हीव' या नावाने युट्यूबवर स्वत:च चॅनल आहे. युट्यूबवरील चॅनलवर अनेक खेळण्यांचे रिव्हीव देण्याचे काम तो करीत असतो. या चॅनेलच्या माध्यमातून त्याने तब्बल १५५ कोटींची कमाई केली आहे. रेयानच्या युट्यूब चॅनलला 1.73 कोटींपेक्षा अनेक लोकांनी (17,314,022 यूझर्स) पसंत (सबस्क्राईब) केलं आहे.
 


'रेयान टॉय रिव्हीव' चॅनलची सुरुवात 


 


रेयानच्या आईन वॉशिंग्टन पोस्टला गेल्या वर्षी मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याच्या आईने सांगितले की, रेयान याला लहानपणापासूनचं खेळण्याचे रिव्हू देणारे  कार्यक्रम पाहायची आवडत होती. एकदा आम्ही खेळण्याच्या दुकानात जाऊन लीगो ट्रेन खरेदी केली आणि वयाच्या चौथ्या वर्षीच 'रेयान टॉय रिव्हीव' चॅनलची सुरुवात झाली. 


रेयानने युट्यूबच्या माध्यमातून जुलै महिन्यात २०१५ साली १०० गाड्या असलेल्या खेळण्याला लोकांसमोर आणलं होतं, यात त्याला खूप प्रतिसाद मिळाला. या रिव्ह्यूमुळे रेयानला तब्बल ९३५ मिलियन वेळा पाहिलं गेलं . आता खेळण्यांसोबतच रेयान लहान मुलांच्या खाद्य पदार्थांचाही रिव्ह्यू करतोय.


सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० मधील यूट्यूब चॅनल्स


 


१)  रेयान टॉईज रिव्ह्यू (Ryan Toys Review) १५४.८४ कोटी रुपये.


२) जॅक पॉल (Jake Paul) १५१.३२ कोटी रुपये.


३) ड्यूड परफेक्ट (Dude Perfect) १४०.७४ कोटी रुपये.


४) डेन टीडीएम (DanTDM) १३०.२१ कोटी रुपये.


५) जेफ्री स्टार (Jeffree Star)  १२६.६७ कोटी रुपये.


६) मार्किप्लायर (Markiplier)  १२३.१५ कोटी रुपये.


७)  व्हेनस गेमिंग (Vanoss Gaming) ११९.६३ कोटी रुपये.


८)  जॅकसेप्टिस आय (Jacksepticeye) ११२.६१ कोटी रुपये.


९)  प्यूडायपाय (PewDiePie) १०९ कोटी रुपये.


१०)  लोगन पॉल (Logan Paul) १०२ कोटी रुपये.