नव्या `अॅन्ड्रॉईड ओरिओ`ची खास वैशिष्ट्यं !
२१ ऑगस्टला अमेरिकेत गूगल मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमचे नवीन व्हर्जन `अॅन्ड्रॉईड ओरिओ` लॉन्च करण्यात आले आहे.
वॉशिंग्टन : २१ ऑगस्टला अमेरिकेत गूगल मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमचे नवीन व्हर्जन 'अॅन्ड्रॉईड ओरिओ' लॉन्च करण्यात आले आहे.
या अपडेटसोबत कंपनीने काही नवीन टूल्स आणि फीचर्स दिले आहेत. गूगल अॅन्ड्रॉईडच्या वेबसाईटच्या एका ब्लॉगनुसार, 'अॅन्ड्रॉईड ओरिओ' मध्ये पिक्चर-इन-पिक्चर मोड, नोटिफिकेशन डॉट्स आणि ब्लूटुथ ऑडिओ प्लेबॅक यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस8, एस8 प्लस आणि एचटीसी यू11 या प्रिमियम स्मार्टफोनमध्येही यावर्षीच्या सॉफ्टवेअर अपडेट मिळण्याची शक्यता आहे.
काय आहेत खास फीचर्स ?
नवा अपडेट केवळ पिक्सल फोन्स आणि नेक्सस 5 एक्स आणि 6 पी फोनवरच टेस्टिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
नवी ऑपरेटींग सिस्टीम 'नुगा'च्या तुलनेत दुप्पट वेगाने काम करणार आहे. त्यामुळे अनेक अॅप्स एकाच वेळेस वापरणं सोपे होणार आहे. परिणामी मल्टीटास्किंग करणं सुकर होईल.
एका वेळी दोन काम कशी करणार ?
जर तुम्ही युट्युबवर व्हिडिओ पहात असाल तर त्याच वेळी इमेलदेखील उघडून पाहू शकाल. यासाठी होम आयकॉनवर क्लिक करून व्हिडिओचा आकार छोटा करता येईल. उरलेल्या स्क्रिनवर तुम्ही इनबॉक्स उघडून मेल लिहू शकाल.वाचू शकाल.