मुंबई : मोबाईलवर कोरोनाच्या कॉलर ट्यूनमध्ये दिलेली माहिती आता अनेकांची पाठ झाली आहे, मात्र अनेकांना या कॉलर ट्यूनचा कंटाळा देखील आहे. पण लक्षात ठेवा ही माहिती सर्वांच्या भल्यासाठी आहे. Corona Caller Tune यातही अनेक वेळा दिल्या जाणाऱ्या माहितीच्या स्वरुपात बदल होत आहे, म्हणून ही माहिती ऐकणे तेवढंच महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला अतिशय महत्त्वाचं काम असेल, तेव्हा एक पर्याय आहे की, ही कॉलर ट्यून टाळून तुम्ही पुढे जावू शकतात. या कॉलर ट्यूनवर सुरुवातीला काही राजकीय पक्षांनी देखील आक्षेप घेतला होता.How to Stop Corona Caller Tune


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कॉलर ट्यून कोरोनाचा संक्रमण कसं रोखता येईल, वैयक्तिक स्वच्छता, लॉकडाऊनविषयीची माहिती, ते थेट कोरोना लसीकरण का आणि कसं महत्त्वाचं आहे. लसीकरणानंतरही सोशल डिस्टन्स किती महत्त्वाचं आहे, अशी सर्व माहिती या कॉलर ट्यूनच्या माध्यमातून आपल्याला सतत मिळत आहे, हे देखील विसरता येणार नाही.


पण सर्वात महत्त्वाचा विषय आहे की ही ट्यून आणि तिची तिच माहिती पुन्हा पुन्हा ऐकण्यात येत असेल, आणि तुमच्याकडे फार महत्त्वाचं काम असेल, म्हणजे एक - एक सेकंद महत्त्वाचा असेल, तेव्हा ही ट्यून म्हणजे एक ट्रफिक सिग्नलवर कंटाळा यावा अशी वाटते, तेव्हा काय करावं. तर याला एक पर्याय जरुर आहे, तो अनेकांना माहित देखील आहे.


पहिला, साधा सोपा पर्याय Corona Caller Tune


यावर एकच पर्याय आहे ही ट्यून टाळून पुढे जाणे. यासाठी फोन लावल्यावर तुम्हाला या ट्यूनची सुरुवात ऐकू आल्यावर फोन लगेच कट करा आणि पुन्हा लावा. नंतरच्या फोनकॉलमध्ये तुम्हाला ही ट्यून ऐकू येणार नाही आणि निश्चितच तुमचा समोरच्याशी लवकरात लवकर संपर्क होईल.


बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी Corona Caller Tune


सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)च्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहक आपल्या मोबाइलवरील  हा कोरोना व्हायरसचा संदेश सोप्या पद्धतीने बंद करु शकतात, साठी मोबाईलवरुन UNSUB लिहून 56700 किंवा 56799 या नंबरवर पाठवा.


एअरटेलच्या ग्राहकांसाठी Corona Caller Tune


एअरटेलच्या ग्राहकांना देखील ही ट्यून बंद करण्याचा पर्याय दिला आहे. तुमच्या मोबाईलवरुन Airtel नंबरवरुन *646*224# डायल करावा लागेल. याशिवाय 1 दाबा. याशिवाय कॉल लावताना कोरोना ट्यून ऐकू आली तर लगेच  * किंवा 1 दाबा, ट्यून बंद होईल.


जिओच्या ग्राहकांसाठी Corona Caller Tune


जिओ ग्राहक आपल्या मोबाईलवरुन STOP लिहून 155223 वर पाठवा. यानंतर कॉलर ट्यून ऐकू येणं बंद होईल. जियो ग्राहक देखील एअरटेलसारखं ट्यून ऐकू आल्यावर  * किंवा 1 दाबून याला बंद करु शकता.


वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांसाठी  Corona Caller Tune


वोडाफोन-आइडिया (Vi) ग्राहक आपल्या मोबाईलमधून CANCT लिहून 144 वर पाठवू शकतात. या शिवाय कोरोना ट्यून ऐकू येताच. नंतर 1 दाबल्यावर ही ट्यून बंद करता येते.


अनेक दिवसापासून लोक त्याच त्याच कोरोना कॉलर ट्यूनने त्रस्त आहेत, अनेकांनी आपला राग सोशल मीडियावर देखील व्यक्त केला आहे, पण सरकारकडून ही ट्यून थांबवण्याची कोणतीही घोषणा झालेली नाही.