मुंबई : स्मार्टफोन आल्यानंतर यूपीआय पेमेंट अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या अॅप्समुळे सोबत कॅशही बाळगावी लागत नाही. तसेच सुटट्या पैशांच्या कटकटीतूनही मुक्ती मिळाली. पानपट्टीपासून अगदी किराणा दुकानात यूपीआय पेमेंट अॅपचा वापर करुन रक्कम देता येते. तसेच प्रत्येक व्यवहारानंतर ठराविक रक्कम प्राप्त होते. त्यामुळे अनेक जणांचा यूपीआय पेमेंट अॅप्सकडे कळ वाढला आहे. (How much money can be transferred via Google Pay in a day know answer) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या काळात Google Pay, Phone Pe आणि Paytm चा मोठ्या प्रमाणात वापर वाढला. दररोज अनेक जण या यूपीआय अॅप्सवरुन पैशांची देवाणघेवाण करतात. पण दिवसभरात गूगल पे (Google Pay) वरुन  किती रक्कम पाठवता येते, याबाबतची मर्यादा किती आहे, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. यूपीआय अॅपच्या व्यवहारावर दैनंदिन किती मर्यादा असतात, हे आपण जाणून घेणार आहोत.  


Google Pay च्या सपोर्ट पेजनुसार, एक युझर्स दिवसभरात खालील अटींपैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करत असेल, तर त्याची दैनिक मर्यादा पूर्ण होईल. 


नक्की काय आहेत मर्यादा 


तुम्ही सर्व UPI अॅप्सवर दिवस भरात 1 लाखांपेक्षा अधिक रक्कम पाठवण्याचा प्रयत्न केल्यास


सर्व UPI अॅप्सवर एकाच दिवसात 20 पेक्षा अधिकदा रक्कम पाठवण्याचा प्रयत्न केल्यास...


जर समोरच्याकडून  तुम्ही 2 हजार  रुपये मागवले असतील तर...


दरम्यान  Google Pay आणि UPI वापरकर्त्यांसाठीची दररोजची व्यवहाराची मर्यादा ही बॅंकेच्या नियमांनुसार वेगवगळी असू शकते. यूझर्सला या अडचणीतून मार्ग काढायचा असेल, तर  खालील पर्याय फॉलो करावे लागतील. 


यूझर्सना अधिकाअधिक रक्कम पाठवायची असल्यास दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागेल. 


कमी रक्कम पाठवता येईल. 


यानंतरही जर यूपीआयच्या माध्यामातून व्यवहार होण्यास अडथळे येत असतील तर त्यामागील कारण काय असू शकतं, हे पण जाणून घेऊयात. 


बॅंक मर्यादा


जर तुम्ही यूपीआयच्या माध्यामातून दररोजच्या मर्यादेपक्षा कमी व्यवहार करत असाल अन त्यानंतरही अडचण येत असेल, तर दुसऱ्या बॅंकेचं खातं वापरुन पाहा. यामागे बॅंकेचे काही नियम आणि मर्यादा असू शकतात. त्यामुळे या मर्यादांमुळेही व्यवहारास अडथळा येत असेल. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या बँकेशी संपर्क साधावा 


इतर कारणांमुळेही व्यवहारात अडथळे


डिजीटल पेमेंट अॅप्सचा जितका फायदा आहे तितकाच धोकाही आहे. एका फेक कॉलमुळे किंवा लिंकमुळे आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. यूझर्सची अशी फसवणूक होवू नये, यासाठी अनेकदा व्यवहार रद्द किंवा रोखले जाऊ शकतात. दैनंदिन मर्यादा ओलांडली नसतानाही जर तुम्हाला व्यवहारास अडथळा येत असल्यास तुम्ही गूगल सपोर्टसह संपर्क साधू शकता. तसेच तुम्ही जर 1 रुपयांपेक्षा कमी रक्कमेचे व्यवहार करत असाल तर ते होणार नाही. अशा वेळेस तुम्हाला सात्तत्याने एरोर येईल.