मुंबई :  काळ्या पैशाला रोखण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी मोदी सरकारने व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा वापर वाढवला आहे. सोबत आधारकार्डासोबत पॅनकार्ड लिंक करण्याचे आदेश दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक लहान मोठ्या व्यवहारांमध्ये पॅनकार्ड आवश्यक झाले आहे. मग तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल किंवा नवीन बनवायचे असेल तर विनाकारण पायपीट करण्यापेक्षा किंवा एजंटला पैसे देण्यापेक्षा हा उपाय नक्की आजमावून पहा. 


घरबसल्या पॅनकार्ड बनवण्याची खास सोय उपलब्ध आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का ?  



घरबसल्या पॅनकार्ड बनवण्यासाठी  काय कराल ?  


तुमच्या मोबाईलवर 'उमंग' नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करा.  उमंग मोबाईल अ‍ॅप्लिकेशन गूगल स्टोअरवर उपलब्ध आहे. 


उमंग (UMANG)म्हणजे यूनीफाइड मोबाइल अ‍ॅप्लीकेशन फॉर न्यू एज गव्हरनन्स असा आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही इतरही अनेक कामं करू शकता.  


अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर माय पॅन सेक्शनवर क्लिक करा. 


माय पॅन सेक्शनमध्ये 49 ए फॉर्म भरा. यामध्ये पॅन कार्डसाठी आवश्यक सारी माहिती काळजीपूर्वक भरावी.  


सीएसएफ फॉर्मच्या मदतीने पॅनकार्डशी निगडीत माहिती अपडेटदेखील केली जाऊ शकते. 


उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून पॅनकार्डचे स्टेट्सदेखील समजते. अ‍ॅपच्या मदतीने पेमेंटदेखील केले जाऊ शकते.