WhatsApp Video Call MMS: जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करून त्यावर बेफिकीर राहिल्यास तर अडचणीत येऊ शकता. कारण आता व्हॉट्सअॅपवर नकळत तुमचा व्हिडीओ बनवला जात आहे आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग करायला सुरूवात करतात. तुम्हाला या कामाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर सविस्तर बातमी जाणून घ्या... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करता तेव्हा तुम्ही घाईघाईने फोन डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला वाटते की कॉल कट झाला आहे पण तसे होत नाही आणि समोरचा तुमचा व्हिडिओ पाहत आहे पण तुम्हाला असे वाटते की कॉल कट झाला आहे. कट तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.


व्हिडिओ कॉल कट झाल्यानंतरही कॅमेरा चालू राहतो


जर तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून कोणतेही व्हिडिओ अॅप डाउनलोड करत असाल तर खूप काळजीपूर्वक डाउनलोड केले पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही ते डाउनलोड करता आणि त्यांना परवानगी देता तेव्हा काही वेळा काही अॅप्स तुमचे व्हॉट्सअॅप हॅक करू शकतात. जेव्हा स्मार्टफोनच्या स्टोरेजची परवानगी मिळते तेव्हा व्हॉट्सअॅप हॅक करणं शक्य असते. 


वाचा : Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत धान्य घेणाऱ्यांसमोर नवीन संकट, जाणून घ्या…


अशा स्थितीत समोरची व्यक्ती तुमचा व्हिडिओ पाहत राहते. बर्‍याच वेळा हॅकर्स दूर बसूनही तुमचा स्मार्टफोन ऍक्सेस करू शकतात आणि तुमच्या स्मार्ट फोनच्या कॅमेरा अ‍ॅक्टिव्ह रनमध्ये तुमच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ बनवत राहतात. हे टाळायचे असेल तर फोनमध्ये अनावश्यक अॅप डाऊनलोड करू नका किंवा स्टोरेजची परवानगी देऊ नका.