Sim Card : अनेकदा आपल्या नकळत कागदपत्रांचा गैरवापर करुन सिम कार्ड (Sim Card) घेतले जातात. मात्र आपल्याला याची माहिती नसेत. यामुळे ज्याच्या नावावर सिम कार्ड घेतला आहेत ती व्यक्ती गोत्यात येण्याची शक्यता असते. अनेकदा तर गैरकाराभारामुळे ज्या व्यक्तीच्या कागदपत्रांवर सिम कार्ड घेतलंय त्या व्यक्तीला जेलची हवा खावी लागते. मात्र तुमच्यासोबत असं होऊ नये यासाठी एक ट्रीक सांगणार आहोत. तुमचे कागदपत्र वापरुन किती सिम कार्ड घेण्यात आले हे कसं जाणून घ्यायचं हे सांगणार आहोत. ही ट्रीक वापरुन तुम्ही ते फेक सिम कार्ड बंद करु शकता. (how to check how many fake sim cards activate on your document and how to block)


या वेबसाईटवर असं तपासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय दूरसंचार विभागाने एक खास पोर्टल लॉंच केलं आहे. या पोर्टलच्या मदतीने तुमच्या नावावर किती सिम कार्ड एक्टीव्ह आहेत याबाबत माहिती मिळेल. तुमच्या नकळत तुमचे कागदपत्र वापरुन जर एखाद्याने सिम कार्ड घेतला असेल, तर तेही तुम्ही ब्लॉक करु शकता. नियमांनुसार, एक व्यक्ती जास्तती जास्त 9 सिम कार्ड घेऊ शकते.


तुमच्या नाववर किती सिम कार्ड? 


दरम्यान तुमच्या नाववर किती सिम कार्ड आहेत हे जाणून घेण्यासाठी (https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php) पोर्टल वर लॉगिन करा. 


यानंतर एका रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर एक ओटीपी येईल, तो एंटर करा. 


यानंतर तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरु आहेत, याची माहिती मिळेल. 


या यादीत जर तुमच्या माहिती बाहेरचा नंबर असेल, तर तो ब्लॉक करण्याचाही पर्याय आहे. 


तुमच्या माहितीत नसलेला नंबर ब्लॉक केल्यानंतर तुम्हाला एक ट्रॅकर लिंक पाठवली जाईल, ज्यावर तुम्हाला नंबर ब्लॉक करण्याबाबतची प्रक्रिया कुठवर आलीय हे समजेल. 


अपेक्षित वेळेनंतर यूझरने ब्लॉक केलेला नंबर आपोआप बंदं होईल.