मुंबई : उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. ज्यामुळे उष्णता इतकी वाढली आहे की, लोकांना आता उन आणि उष्णता सहन होत नाहीय, ज्यामुळे अनेक लोक एसी कडे वळले आहेत. लोकांना थांडावा आणि शांतता मिळावी यासाठी ते नवीन एसी विकत घेत आहेत. परंतु यासंबंधीत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना सतावतात. जसे की, मी नक्की कोणता AC घेऊ, किती टनचा घेऊ. तसेच AC मुळे बिल जास्त आलं तर? ते कमी करण्यासाठी काही पर्याय आहे का? इत्यादी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आज आम्ही तुम्हाला AC घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुमचा फायदाच होईल.


मी कोणत्या प्रकारचा AC घ्यावा?


सर्वप्रथम, हे जाणून घ्या की, तुम्हाला बाजारात दोन प्रकारचे एसी मिळतील, एक विंडो एसी आणि एक स्प्लिट एसी. तुम्ही तुमच्या घरासाठी कमी मेंटेनन्स वाला एसी खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्ही विंडो एसी घ्यावा कारण तो वापरण्यास सोपा आहे आणि स्प्लिट एसीपेक्षा खूपच स्वस्त आहे. परंतु हे लक्षात घ्या की, विंडो एसी खूप गोंगाट करणारे असतात. त्यामुळे त्यांना आपल्या घरी लावण्यासाठी जाड भिंती आवश्यक असतात.


परंतु स्प्लिट एसी खरेदी करताना हे लक्षात ठेवा की इंस्टॉलेशन आणि मेन्टेनन्सचा खर्च खूप जास्त आहे. विंडो एसीच्या तुलनेत ते आवाज करत नाही आणि कोणत्याही भिंतीवर सहजपणे बसवता येते.


आता प्रश्न असा उभा राहातो की, एसीची क्षमता किती असावी?


योग्य एसी खरेदी करताना सर्वप्रथम तुमच्या एसीची क्षमता किती असावी याकडे लक्ष द्या.


आत एसीची योग्य क्षमता कशी शोधायची? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्या खोलीचा आकार, त्याचे सामान्य तापमान आणि खोलीतील भिंतींची संख्या, याच्या आधारे एसीची क्षमता निवडली जाते.


एसी वीज वाचवू शकतो का?


नवीन एसी घेताना, त्याला एनर्जी रेटिंग काय मिळते हे पाहणे देखील खूप महत्वाचे आहे. पाच स्टार्सपैकी एसीला विजेते तारे दिले जातात, जितकी जास्त वीज वाचते. चांगला एनर्जी रेटिंग असलेला एसी तुमचे वीज बिल जास्त वाढू देणार नाही. एनर्जी रेटिंगनुसार एसी घेणे खूप फायदेशीर ठरते.


इन्व्हर्टर एसी आणि नॉन-इन्व्हर्टर एसीमध्ये काय फरक आहे?


जेव्हा तुम्ही एसी घ्याल तेव्हा तुम्हाला सांगितले जाईल की एसी इन्व्हर्टर किंवा नॉन-इन्व्हर्टर एसी असू शकतो. या दोघांमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया. तुम्ही नॉन-इनव्हर्टर एसी घेतल्यास, याचा अर्थ त्याचा कंप्रेसर एका ठराविक वेगाने काम करतो आणि तो एकतर चालू किंवा बंद केला जाऊ शकतो.


इन्व्हर्टर एसी जास्त महाग असतात पण त्यात एसीचे तापमान नियंत्रित करणे खूप सोपे होते आणि याद्वारे एसी कोणत्याही त्रासाशिवाय वापरता येतो.


या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही एसी खरेदी केल्यास तुमच्या गरजेप्रमानेच एसीच आणाल अशी आशा आहे.