मुंबई : तुमच्या फ्रेंड्सचे व्हाट्सअॅप स्टेटसचे फोटोज, व्हिडिओज डाऊनलोड करु इच्छिता? मग त्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत. या सोप्या ट्रिक्सने तुम्ही स्टेटस फोटो, व्हिडिओज अगदी सहज डाऊनलोड करु शकाल. तर पाहुया काय आहेत या पद्धती...


पहिली पद्धत


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    इंटरनेट डेटा ऑन असताना व्हॉट्सअॅप अकाऊंटवर जा.

  • ज्याचे स्टेटस डाऊनलोड करायचे आहे ते स्टेट्स पहा.

  • आता स्मार्टफोनच्या फाईन मॅनेजरमध्ये जा.

  • सेटिंगसमध्ये जावून Show Hidden Files वर टॅप करा.

  • आता तिथे व्हॉट्सअॅप-मीडिया-स्टेटस्स ला नेव्हिगेट करा.

  • तिथे तुम्हीही व्हॉटसअॅप स्टेटस पाहू शकाल.

  • या फाईल्स कॉपी करुन एका फोल्डरमध्ये सेव्ह करा.

  • अशाप्रकारे तुम्ही फ्रेंड्सचे स्टेट्स डाऊनलोड करु शकता.

  • ही पद्धत सर्वच ऑपरेटींग सिस्टममध्ये काम करत नाही. अशावेळी ही दुसरी पद्धत कामी येते.


दुसरी पद्धत


  • गुगल प्ले स्टोरवरु थर्ड पार्टी अॅप व्हॉट्सअॅप स्टेटस डाऊनलोड मॅनेजर अॅप डाऊनलोड करा आणि इंस्टॉल करा.

  • आता व्हॉट्सअॅप अकाऊंटवर जावून स्टेटसवर जा.

  • ज्या फ्रेंड्सचे स्टेटस डाऊनलोड करायचे आहे ते पाहा.

  • आता इंस्टॉल केलेले अॅप ओपन करा.

  • तिथे टॅप करून जे स्टेटस डाऊनलोड करायचे आहे ते करा.