घरबसल्या मालामाल होण्यासाठी या `3` वेबसाईट्स लोकप्रिय !
काही लोक पार्ट टाईमसाठी किंवा एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी पैसे मिळवण्याचे इतर अनेक पर्याय शोधत असतात.
मुंबई : काही लोक पार्ट टाईमसाठी किंवा एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी पैसे मिळवण्याचे इतर अनेक पर्याय शोधत असतात. मात्र घरबसल्या आणि इंटरनेटच्या मदतीने पैसे कमवण्यासाठी काही वेबसईट्स खूपच प्रसिद्ध आहेत. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (URL)देखील असाच एक पर्याय आहे. URL च्या मदतीने इंटरनेटवर महिन्याभरात हजारोंची कमाई केली जाऊ शकते. .मग पहा काय आहे हे यूनिफार्म रिसोर्स लोकेटर?
यूनिफार्म रिसोर्स लोकेटर म्हणजे काय ?
यूनिफार्म रिसोर्स लोकेटरमुळे तुम्ही कोणतीही लिंक शेअर करू शकता. सोशल मीडियावरही URL ट्रेंड करते. लहान स्वरूपातील यूआरएल इंटरनेटवर सहज रिडिरेक्ट केले जाऊ शकतात. इंटरनेटवर व्हायरल होणारे मेसेज, व्हिडिओ, फोटोदेखील या मदतीने व्हायरल केले जातात. यूआरएल लहान करण्यासाठी गूगलसारखी कंपनीदेखील सेवा देते.
कशी कराल कमाई ?
इंटरनेटवरील अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर सहज शेअर करतो. या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर तुम्हांला मोठ्या स्वरूपातील युआरएल छोट्या स्वरूपात बदलून ते सोशल मीडियावर शेअर करणं आवश्यक आहे. तुम्ही शेअर केलेल्या युआरएलवर फ्लॅश होणार्या जाहिराती जितके युजर्स पाहतील त्यावर तुम्हांला काही टक्के पेमेंट मिळणार आहे. कमेंट, लाईक्स आणि व्हिजिबिलिटीच्या प्रमाणावर पेमेंट ठरवले जाते.
कोणत्या कंपनी देते याप्रकारचे सेवा ?
1. Adf.ly
Adf.ly या वेबसाईटला सर्वात जास्त विश्वसनीय मानले जाते. युआरएल शॉर्ट करून तुम्ही पैसे कमवू शकता. Adf.ly वर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. कमीत कमी 5 डॉलरचे पेमेंट PayPalअकाऊंटमध्ये येते.
तुम्ही शेअर केलेल्या युआरएलवर किती हिट्स मिळाले याचीदेखील माहिती मिळते. प्रत्येक देशामध्ये पेमेंटचा रेट हा वेगवेगळा आहे. भारतामध्ये
प्रति 1000 व्ह्युजवर 1.09 डॉलर म्हणजेच 70.85 रूपये या हिशोबाने पैसे मिळतात. तुम्ही मित्राला रेफर केल्यास 20% कमिशनदेखील मिळवू शकता.
2. Adv.li
या वेबसाईटवर युआरएल लहान स्वरूपात करण्यासाठी एक ठराविक रक्कम मिळते. या वेबसाईटची खास गोष्ट म्हणजे एकावेळेस 100 किंवा त्यापेक्षा अधिक युआरएल लहान करता येऊ शकते. या वेबसाईटवर परफॉर्मिंग मीटरद्वारा युआरएलचा परफॉर्मन्सदेखील पाहिला जाऊ शकतो. भारतामध्ये यामधून मिळणारी रक्कम कमी आहे. भारतामध्ये एका लिंकवर 100 व्हूज मिळाल्यानंतर केवळ 0.41 डॉलर म्हणजे 26.65 रुपये मिळतात.
3. LinkBucks
या वेबसाईटच्या मदतीनेदेखील युआरएल छोटा केला जाऊ शकतो. कंपनी तुम्ही शेअर केलेली लिंकवर मिळणार्या लाईक्स पाहून त्यावर पेमेंट ठरवतात. वेबसाईट द्वारा शेअर केलेल्या युआरएलमुळे तुम्हांला कमीत कमी 10 डॉलर PayPal अकाऊंटमध्ये मिळू शकतात. भारतामध्ये ही वेबसाईट 0.90 डॉलर म्हणजेच 58.5 रूपये प्रति 1000 व्ह्यूज याप्रमाणे पेमेंट करते.