मुंबई : आज रस्त्यावर, ट्रेनमध्ये, दुकानांमध्ये कोठेही चार्जर विकण्यासाठी लोकं येतात. पण त्याची गुणवत्ता किती चांगली आहे हे ओखळणं कठीण असतं. आज खूप कमी लोकं आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत. लोकांचा कल हा चांगल्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्मार्टफोनकडे जास्त असतो. पण आता अनेकांनी ब्रँडेड कंपन्यांच्या वस्तूंचे हुबेहुब वस्तू बनवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वस्तू खरी की डुप्लीकेट हे ओळखणं कठीण झालं आहे.


1. वस्तूची गुणवत्ता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही ब्रँडेड वस्तूसाठी वापरण्यात येणारं मटेरिअल हे चांगल्या प्रतीचंच असतं. मग ते प्लास्टिक, रबर किंवा अॅल्यूमिनियम असो प्रत्येकाची गुणवत्ता चांगली असते. पण जर समजा नकली चार्जर असेल तर त्यासाठी वापरण्यात आलेलं प्लास्टिक, फिनिशिंगवरुन तुम्हाला त्याची गुणवत्ता कळू शकते.



2. ब्रँडचा लोगो


एका लोगोमध्ये कोणत्याही ब्रँडचा चेहरा असतो. लोगो असा बनवला जातो ज्याच्यामध्ये कोणताही बदल नाही केला जाऊ शकत. कोणत्याही ओरिजनल वस्तूवरुन लोगो कधीच सहज मिटला जात नाही. अनेक वर्ष तो तसाच असतो. पण जर वस्तू नकली असेल तर तो लगेच निघून जातो.



3. प्लग व्यवस्थित पाहा


चार्जर जर ओरिजनल असेल तर तो व्यवस्थित प्लग होतो. पण चार्जर नकली असेल तर तो सहज बसत नाही आणि कालांतराने ते लूज होऊन जातं.