मुंबई : अधिक मेमरी म्हणजेच स्पेससाठी स्मार्टफोनमध्ये मेमरी कार्डचा वापर केला जातो. यात युजर्स आपल्या वैयक्तिक माहितीसोबत इतर महत्त्वाच्या गोष्टी, फोटोज सेव्ह करुन ठेवतात. पण जर मेमरी कार्डचं खराब झाले तर? मेमरी कार्ड खराब झाल्यानंतर डेटा रिकव्हर करता येत नाही आणि सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स, फोटोज डिलीट होतात. तुम्हाला माहित का? मेमरी कार्ड खराब होण्याचे मुख्य कारण काय आहे. मग जाणून घ्या.... त्याचबरोबर मेमरी कार्ड ठीक करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स...


मेमरी कार्ड खराब का होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेमरी कार्ड खराब होण्याचे मोठे कारण आहे तुमचा फोन. स्मार्टफोनमधून ब्राऊजिंग करतातना किंवा थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करताना व्हायरस येतो. त्यामुळे मेमरी कार्ड खराब होते. त्याचबरोबर अॅनरॉईडला मेमरी कार्ड खराब होण्याचे कारण मानले जाते. कारण त्यात सहज व्हायरस येतो.


मेमरी कार्ड कसे ठीक करावे?


  • सर्वात आधी मेमरी कार्ड आपल्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरला कनेक्ट करा. कार्ड रिडरच्या माध्यमातून ते कनेक्ट करता येईल.

  • त्यानंतर Ctrl+R कमांड द्या. आता एक विंडो ओपन होईल त्यात CMD टाईप करुन एंटर करा.

  • आता तुमच्या मेमरी कार्डचे नाव त्यात टाका. उदा. मेमरी कार्डचे नाव L: असल्यास L: लिहून एंटर करा.

  • त्यानंतर एक कंपर्मेशन मेसेज येईल. त्यात होय साठी Y आणि नाही साठी N एंटर करा.

  • Y वर क्लिक केल्याने मेमरी कार्ड format होण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर ते ठीक होईल. 


नोट: यामुळे फक्त मेमरी कार्ड ठीक होईल. डिलीट झालेला डेटा परत मिळणार नाही. म्हणून मेमरी कार्डमधील डेटा कंम्पुटर किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करुन ठेवा.