GPay वरील प्रत्येक पेमेंटवर 50 ते 100 रुपयांचं कॅशबॅक! कशी कराल कमाई? जाणून घ्या
Cashback On Google Payment: गेल्या काही दिवसात डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. डिजिटल पेमेंट करताना अनेकदा कॅशबॅकही मिळतं. त्यामुळे डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याची संख्या वाढली आहे. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गुगल पेमेंटचा बोलबाला आहे. जीपे सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप आहे.
Cashback On Google Payment: गेल्या काही दिवसात डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. डिजिटल पेमेंट करताना अनेकदा कॅशबॅकही मिळतं. त्यामुळे डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याची संख्या वाढली आहे. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गुगल पेमेंटचा बोलबाला आहे. जीपे सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप आहे. सुरुवातील पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक मिळत होतं. मात्र आता तितकं कॅशबॅक मिळत नाही. तुम्हालाही कॅशबॅक मिळत नसेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. या माध्यमातून तुम्ही कॅशबॅकसह कुपन्स आणि ऑफर्स मिळवू शकता. गुगल पेमेंट अॅपवर विजिट केल्यानंतर काही प्लान पाहायला मिळतात. गुगल पेमेंटमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत काही ऑफर्स आहेत. जर तुम्ही योग्य प्लान निवडला तर चांगला कॅशबॅक मिळू शकतो. गॅस बिल, वीज बिल, पेट्रोल बिल भरल्यानंतर तुम्हाला चांगला कॅशबॅक मिळू शकतो. जर तुम्हाला चांगल्या कॅशबॅकची अपेक्षा असेल तर ही ट्रिकचा अवलंब कराल.
वेगवेगळ्या अकाउंटवर पेमेंट करा
जर तुम्ही एकाच खात्यावर मोठी रक्कम पाठवली आणि तुम्हाला मोठा कॅशबॅक मिळेल असे वाटत असेल, तर तसे नाही. तुम्हाला कॅशबॅक हवा असेल तर वेगवेगळ्या खात्यांवर पेमेंट करा. यामुळे जास्त कॅशबॅक मिळेल आणि त्याची शक्यताही जास्त असेल.
बातमी वाचा- Home Loan सुरु असताना पर्सनल लोन हवं आहे! जाणून घ्या मिळणार की नाही
मोठी रक्कम ट्रान्सफर करू नका
तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम ट्रान्सफर करू नका. कारण गुगल पेमेंटवर जास्तीच कॅशबॅक मिळणार नाही. तीच रक्कम तुम्ही वेगवेगळ्या अकाउंटवर ट्रान्सफर कराल तर कॅशबॅक मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते.