Tips To Improve Internet Speed in Smartphone: हल्लीच्या दिवसांमध्ये स्मार्टफोन (Smartphone) आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. Online Classes असो किंवा Net Surfing प्रत्येक वेळी हा स्मार्टफोन आपल्या हातात दिसतो. म्हणजे आयुष्यभराच्या जोडीदारापेक्षाही जास्त वेळ आपण या मोबाईल नावाच्या मित्राला देतो असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातात स्मार्टफोन असला आणि त्यामध्ये इंटरनेट असलं, म्हणजे विषयच संपला. पण, इंटरनेट असूनही बऱ्याचदा असं होतं की, नेट स्पीड अनपेक्षितरित्या कमी झाल्यामुळं अडचणीही येतात. 


कधीकधी एखादा फॉर्म भरताना, किंवा काही पाहताना मध्येच नेट डाऊन होतं आणि सगळं गणितच बिघडतं. आता यावरही तोडगा आहे. मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवून सर्फिंगचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला फक्त काही टीप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. 


बऱ्याचदा Cache फुल झाल्यानंतर अँड्रॉईड फोन स्लो होण्यास सुरुवात होते. याचा थेट परिणाम इंटरनेट स्पीडवर होतो. यासाठीच वेळोवेळी Cache क्लिअर करायला विसरु नका. 


फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तिथं नेटवर्क सेटिंगमध्ये जाऊन प्रेफर्ड नेटवर्क टाईप 4 जी किंवा एलटीई आहे की नाही, हे पाहा. नसल्यास इथं जाऊन उपलब्ध पर्याय निवडा. 



फोन रिस्टार्ट करण्यामुळंही लगेचच मोबाईल नेट चांगलं काम करु लागतं. फोन पुन्हा सुरु केल्यामुळं तो नव्यानं इंटरनेट शोधतो आणि यामुळं डेटा स्पीडही वाढतो. 



मोबाईलमधील ऑटो डाऊनलोड हा फिचर डिसेबल ठेवा. जेणेकरुन तुमच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट डाऊनलोड होणार नाही आणि इंटरनेट वाया जाणार नाही. 



सर्वात शेवटची टीप म्हणजे ज्या अॅप्सचा वापर तुम्ही करत नाही, अशा अॅपला मोबाईलमध्ये थारा देऊ नका. वरच्या काही टीप्स पाहून बघा कसा धावतो तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड.