मुंबई: कितीही दमदार बॅटरीचा स्मार्टफोन घेतला तरी त्याच्या अति वापरामुळे आपली बॅटरी उतरते. बऱ्याचदा आपण चार्जिंगला लावणं विसरतो. त्यामुळे कमी टक्के बॅटरीतही जास्त वेळ काम चालवणं गरजेचं असतं. किंवा इमरजन्सीच्या काळात मोबाईलची बॅटरी वाचवण्यासाठी आज काही सोप्या गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करायला हव्या. त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरीही वाचेल आणि जास्तवेळ तुम्हाला फोन वापरता येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या फोनच्या स्क्रीनचा ब्राइटनेस आवश्यक नसेल तेव्हा कमी ठेवा. स्क्रीनच्या ब्राइटनेससाठी मोबाईल जास्त बॅटरी वापरतो. ऑटो ब्राइटनेस मोड एंड्रॉयड 9  आणि त्यावरच्या फोनला उपलब्ध आहे. मात्र त्याचा वापर गरज नसेल तर बंद करा. त्यामुळे तुमची बॅटरी विनाकारण खर्च होणार नाही. 


अँन्ड्रॉइड 6.0 नंतरच्या सगळ्या सॉफ्टवेअरसाठी बॅटरी लाईफ कंट्रोल करण्यासाठी एक टूलचा वापर करण्यात आला आहे. हा पर्याय निवडला तर तुमचे अॅप्स रनिंग करणं बंद होतात आणि त्यामुळे बॅटरीचं आयुष्य वाढतं.  Adaptive Battery किंवा Battery Optimisation पर्याय कायम सुरू ठेवा.


अनेक युझर्स स्क्रीन टाइन आऊट किंवा स्क्रीन लॉक करण्याचा वेळ 1 मिनिटं ठेवतात. मात्र असं केल्यानंही बॅटरी उतरते. स्क्रीन लॉकचा टाइम कमी सेकंद ठेवा. याशिवाय बॅगराऊंड रनिंग अॅप क्लिअर करा.


युझर्सने अनावश्यक अॅप बंद करायला हवेत. याशिवाय गरज नसलेले अॅप फोनमधून डिलिट करणं केव्हाही चांगलं. त्यामुळे बॅटरी तर वाचतेच पण त्यासोबत फोनमध्ये विनाकारण जागा भरलेली राहात नाही. याशिवाय तुम्ही बॅटरी सेव्हरचा पर्याय वापरू शकता. नोटिफिकेशन पर्याय किंवा नेट नको असेल तेव्हा बंद करा त्यामुळेही बॅटरी वाचेल.