मुंबई: गुगलवर आपण अनेक वेबसाईट शोधत असतो. अनेक गोष्टी आपण शोधतो बरेचदा आपला डेटाही तिथे असतो. आपलं गुगल सर्चही हॅक होऊ नये ते सुरक्षित राहावं यासाठी आज आपण काही खास सोप्या ट्रिक पाहणार आहोत. ज्याच्या मदतीनं तुम्ही गुगल अकाऊंट सुरक्षित ठेवू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅकर्सची नजर कधी कोणत्या सोशल मीडिया असो किंवा गुगल अकाऊंटवर पडेल सांगता येत नाही. अशावेळी फक्त आपण आपल्या गुगल अकाऊंटची सुरक्षा वाढवू शकतो. हॅकिंग रोखण्यासाठी सुरक्षित गुगल खाते असणे खूप महत्वाचे आहे. कारण अनेक सोशल मीडिया अकाऊंट त्याला जोडलेले असतात. 


Google अकाऊंटसह कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन केले तर आपले Google अकाऊंट तसेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्स देखील हॅक होऊ शकतात. म्हणून आपण सावध असणं आवश्यक आहे.


तुम्ही जर तुमचं गुगल अकाकाऊंट सुरक्षित ठेवू इच्छिता तर ते सतत चेक करत राहायला हवं. त्यासाठी गुगल सिक्युरिटी टूलचा वापर करणं आवश्यक आहे. तुमचा स्मार्टफोन, पीसी-लॅपटॉप किंवा टॅबलेटसाठी सिक्योरिटी चेकअप टूलचा वापर करता येणार आहे. 


आपण आपले Google अकाऊंट तयार केलं असेल किंवा आपण एखादे Google अकाऊंट तयार करत असाल तर आपल्याकडे आपल्या Google अकाऊंटसाठी एक चांगला हार्ड पासवर्ड ठेवा. Google ने सजेस्ट केलेला पासवर्डही खूप कठीण असतो. जो लक्षात ठेवणे खूप कठीण असतं. 


जर कोणी आपल्या पासवर्डमध्ये कोणी छेडछाड करत असेल तर आपल्याला अलर्टचा मेसेज येईल. त्यासाठी तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. या टू स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला गुगल अकाऊंट लॉगइन केल्यानंतर प्रत्येकवेळी अलर्ट देईल. त्य़ासोबत आपल्याला एक कोडही येईल. जो कोड टाकल्यानंतर गुगल अकाऊंट लॉगइन होऊ शकतं.