Mobile phone hacked: आजकाल प्रत्येकजण मोबाईलचा वापर सर्रास करताना दिसतो. मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा लोक एकमेकांसोबत बोलत नव्हते अशातला भाग नाही,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मोबाईल आले संवाद आणखी सोपा झाला. स्मार्टफोनच्या (smartphone) येण्याने सगळी काम खूप सोपी झाली. अनेक काम सोपी झाली खरी पण तितकेच त्याचे धोकेसुद्धा वाढले. 


कारण मोबाईलमध्ये आपले अतिशय महत्वाची माहिती बँक अकाउंट डिटेल्स पर्सनल डेटा सगळं काही सेव्ह असत. आणि अशावेळी मोबाईल हॅक  होण्याचं प्रमाण वाढतं. यानंतर आपला महत्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो.आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होत. 


अनेकवेळा युजर्सना आपला मोबाईल हॅक (mobile hacking) झाल्याचेही कळत नाही.  हॅकर्स तुमचा सर्व पर्सनल डेटा चोरून त्याचा गैरवापर करू शकतात आणि अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.  बँक खात्यातील (bank account hack) पैसे काढणे ते अगदी तुम्हाला ब्लॅकमेल करण्यापर्यंत सगळं काही घडत. 


पण तुम्हाला माहीत आहे का ,मोबाईल हॅक झालाय हे तुम्ही ओळखू शकता आणि वेळीच सावध होऊ शकता .. (how to know your mobile is hacked this are the symptoms )


कसं समजेल तुमचाही मोबाईल झालाय हॅक 


मोबाईलचा स्पीड अचानक कमी होणे किंवा तो सतत हँग होऊ लागतो.. अनेकदा असं होत आतापर्यंत फोन चांगला चालेल असतो आणि अचानक तो हँग होऊ लागतो अशा वेळी समजून जायचं कि फोनमध्ये मॅलवेअर आहे. 


चांगला चालणारा फोन अचानक स्लो काम करू लागतो आणि आपल्याला वाटतं कि कदाचित फोन हँग होतोय पण यामागे हॅकिंग हेसुद्धा कारण असू शकतं. (how to know your mobile is hacked this are the symptoms )


मोबाइल सेन्सर आणि बॅटरी


वारंवार चार्ज करूनसुद्धा फोनची बॅटरी उतरत असेल  मोबाईल स्क्रीन बंद केल्यावरसुद्धा अँप काम करत असतील तर सावध व्हा कारण कोणीतरी तुमचा मोबाईल हॅक करत आहे. मोबाइलचे सेन्सर पुन्हा पुन्हा डिटेक्ट होऊ लागतात. हे देखील मोबाईल हॅक होण्याचं चिन्ह आहे.


कॉल आणि एसएमएस


बऱ्याचदा आपल्याला विशिष्ठ डिजिट असणाऱ्या नंबरवरून कॉल येतात मेसेजेस येतात आणि आपण त्यावर क्लिक करतो अजाणतेपणी केलेलं एक क्लिक तुमचा मोबाईल हॅक व्हायला पुरेसा आहे.  (how to know your mobile is hacked this are the symptoms)