फ्रीमध्ये रिंगटोन बनविण्याच्या 5 सोप्या टीप्स, अशी आहे पद्धत
तुम्हाला जर तुमच्या फोनच्या रिंगटोनमध्ये आपले नाव यावे असे वाटत असे तर, तर तुम्ही ते आणू शकता. तेसुद्धा एकही पैसा खर्च न करता. त्यासाठी जाऊन घ्या सोपी पद्धत.
मुंबई : तुम्हाला जर तुमच्या फोनच्या रिंगटोनमध्ये आपले नाव यावे असे वाटत असे तर, तर तुम्ही ते आणू शकता. तेसुद्धा एकही पैसा खर्च न करता. त्यासाठी जाऊन घ्या सोपी पद्धत.
- पहिल्यांदा आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्यूटरवरून http://freedownloadmobileringtones.com वेबसाईटवर जा. इथे तुम्हाला एका निळ्या पट्टीवर सर्च रिंगटोनचा ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर तुम्हाला नवे पेज ओपन झालेले दिसेल. यात एक बॉक्स असेन या बॉक्सवर आपले नाव लिहून रिंगटोन सर्च करा.
- सर्च पूर्ण झाल्यावर आपल्यासमोर अनेक रिंगटोन दिसतील. त्यापैकी आपल्याला हवी ती रिंगटोन डाऊनलोड करायची आहे. रिंगटोनच्या खालीच आपल्याला रिंगटोन डाऊनलोड करण्यासाठी लिंग दिलेली असते. तिथे रिंगटोनचे नाव वाचून ती डाऊनलोड करा. इथे क्लिक करता तुम्हाला नवीन पेज ओपन झालेले दिसेल.
- नव्याने ओपन झालेले पेज स्क्रोल करत तुम्ही खाली याल. तर, तुम्हाला डाऊनलोडचा ऑप्शन दिसेल.
- या ऑप्शनवर क्लिक करताच आणखी एक नवे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला रिंगटोन वाजलेली ऐकू येईल. इथे क्लिक करताच तुमचे मिशन फत्ते झाले म्हणून समजा. तुमची रिंगटोन डाऊनलो झालेली असेल. तुम्ही त्या रिंगटोनचा आनंद घेऊ शकता.