मुंबई : नेटवर्क नसेल तर मोबाईला काही अर्थ नसतो. पावसाळ्यात अनेक वेळा आपल्या मोबाईलचं नेटवर्क गायब होतं. एखादा महत्त्वाचा फोन करायचा असेल आणि नेटवर्क नसेल तर तुमची चिडचिड होते. मोबाईलला नेटवर्क नसल्यास अनेक गोष्टींसाठी तुम्हाला प्रॉब्लेम होतो. ग्रामीण भागात अनेक वेळा नेटवर्क नसते. पण आजकाल नेटवर्कची समस्या शहरातही होतेय. नेटवर्क नसताना आपण सोशल मीडियाची मदत घेतो. यावरून आपण व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉल करतो. पण यासाठी समोरच्या व्यक्तीचे नेट सुरु असेल तरच हे शक्य आहे. मग जर एखादा कॉल खूप महत्त्वाचा आहे आणि नेटवर्क नाही तर अशावेळी काय करणार? आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन असतात आणि तुमच्या या स्मार्टफोनमध्ये एक खास असा फिचर आहे, ज्याद्वारे तुम्ही नेटवर्क नसतानाही कॉल करु शकतात. चला जाणून घेऊयात या फिचरबद्दल...


WiFi कॉलिंग फिचर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाइल नेटवर्क नसतानाही  WiFi कॉलिंग फिचरच्या मदतीने तुम्ही सहज कोणालाही कॉल करू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये हा फिरला अॅक्टिव्ह करा आणि नेटवर्कशिवाय फोन लावा. या फिचरमुळे तुम्ही कुठल्याही कोपऱ्यातून मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांशी संपर्कात राहू शकता. पण यासाठी तुमच्याकडे WiFi नेटवर्कशी कनेक्ट असणे गरजेचं आहे.



Android युजर्ससाठी 


Android यूजर्स आहेत तर नेटवर्क नसल्यास घाबरायचं कारण नाही. सगळ्यात पहिले आपल्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. फोनच्या सेटिंग्जमध्ये सिम अँड नेटवर्कचा पर्याय दिसेल. यातील सिमचा पर्याय निवडा. यावर क्लिक करून तुम्हाला WiFi कॉलिंगचा पर्याय दिसेल. या फिचरला ऑन करून तुम्ही नेटवर्कशिवाय फोन लावू शकता.


iPhone युजर्ससाठी


Android यूजर्सप्रमाणे नेटवर्कशिवाय iPhone यूजर्स पण बिनधास्त देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून फोन लावू शकतात. आयफोन युजर्स सेटिंग्जमधील मोबाईल डेटा पर्यायावर क्लिक करून तुम्हाला WiFi कॉलिंगचा पर्याय दिसेल. त्यानंतर WiFi calling on this iPhone या पर्यायावर क्लिक करा. यामुळे आयफोनमध्ये WiFi कॉलिंग हे अ‍ॅक्टिव्ह होईल. यानंतर तुम्ही कोणालाही फोन करु शकता.