WhatsApp च्या `या` ट्रीकची सर्वत्र दहशत! असे वाचा Delete झालेले मेसेज
WhatsApp ने वेळोवेळी अशी अनेक नवीन वैशिष्ट्ये जारी केली आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांसाठी चॅटिंग मनोरंजक आणि सोपे झाले आहे.
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक, WhatsApp ने वेळोवेळी अशी अनेक नवीन वैशिष्ट्ये जारी केली आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांसाठी चॅटिंग मनोरंजक आणि सोपे झाले आहे. WhatsApp जेव्हापासून बाजारात आलं, तेव्हापासून ते आतापर्यंत त्याच्यामध्ये अनेक फरक पाहिले गेले आहे. WhatsApp ने त्याच्या नवनवीन फीचरमुळे लोकांना वेड लावले आहे.
WhatsApp च्या नवीन आलेल्या फीचर्सपैकी एक आहे, WhatsApp वरील संदेश हटवण्याचे फीचर्स. म्हणजेच या फीचरमुळे तुम्ही केलेला संदेश एका विशिष्ट वेळापर्यंत डिलिट करु शकतात.
हे मेसेज डीलीट केल्यावरती पुन्हा मिळत नाहीत. परंतु आता व्हॉट्सऍपने असे फीचर आणले आहे ज्यामुळे तुम्हाला तुमची डीलीट झालेली माहिती आणि मेसेज पुन्हा मिळू शकतात.
हटविलेले संदेश कसे मिळवावे?
जर तुम्ही कोणतेही महत्त्वाचे मेसेज डिलीट केले असतील, तर ते क्लाउड द्वारे पुनर्प्राप्त केले जाऊ शकतात. व्हॉट्सऍपवर मेसेज आणि चॅटचा बॅक अप घेण्याचा पर्याय तेथे असतो, जेणेकरून व्हॉट्सऍप क्लाउडमध्ये तुमच्या मेसेजेसचा बॅकअप घेतला जाईल.
अँड्रॉइड स्मार्टफोनवर, हा बॅकअप दररोज रात्री 2 ते 4 वाजेदरम्यान होतो आणि अशा प्रकारे जर तुमचा फोन हरवला, तुटला किंवा तुमचे मेसेज किंवा चॅट्स डिलीट झाले, तर तुम्ही या व्हॉट्सऍप बॅकअपद्वारे ते पुन्हा मिळवू शकता.
चॅट बॅकअपशिवाय असे मेसेज मिळवा
जर तुम्ही व्हॉट्सऍपची चॅट बॅकअप सेवा वापरत नसाल आणि तुम्हाला तुमचा डीलीट झालेला मेसेज पुन्हा हवे असेल, तरी देखील तुम्ही ते मिळवू शकता. तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ता असल्यास, आपल्या स्मार्टफोनच्या स्थानिक बॅकअपमधून चॅट आणि संदेश देखील पुनर्प्राप्त करू शकता.
हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या फाइल मॅनेजरकडे जावे लागेल, अँड्रॉइड फोल्डर शोधा आणि उघडा, त्यात व्हॉट्सऍप फोल्डर शोधा आणि निवडा.
त्यातील डेटाबेस फोल्डरवर जा. तेथे जाऊन, तुम्हाला जुन्या बॅकअप फोल्डरचे नाव बदलावे लागेल, उदा. ‘msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt12’ हे बदलून ‘msgstore.db.crypt12’ करा. अशाप्रकारे तुमच्या शेवटच्या बॅकअपपर्यंतचे मेसेज व्हॉट्सऍपवर आणले जातील.
अशाप्रकारे, या दोन युक्त्यांच्या मदतीने, आपण व्हॉट्सऍपवर मेसेज मिळवू शकता. लक्षात ठेवा तुम्ही ज्या दिवशी मेसेज किंवा चॅट पुनर्प्राप्त कराल, त्या दिवसापर्यंतचे मेसेज व्हॉट्सअॅपवर येतील आणि त्यानंतरचे मेसेज डिलीट केले जाऊ शकतात कारण तुम्ही जुन्या दिवसाच्या बॅकअपपर्यंत पोहोचाल.