मुंबई : उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामध्ये आता उष्णतेपासून वाचण्यासाठी लोकं AC चा वापर करतात. परंतु ज्यांच्याकडे AC आहे किंवा जे AC घेण्याचा विचार करत असणार त्यांच्या सध्या एकच विचार मनात येत असणार, तो म्हणजे AC चे बिल. अशात AC कंपनींचे वेगवेगळे दावे आहेत, ज्यामध्ये ACचे  बिल कमी येत असल्याचे म्हंटले जात आहे. परंतु तुम्ही तुमचा जुना AC वापरुन सुद्धा करु बिल कमी करु शकता. फक्त तुम्हाला गरज आहे ती, योग्य मार्ग वापरण्याची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही आज तुम्हाला काही टिप्स देत आहोत, त्यानुसार जर तुम्ही AC चालवाल, तर नुसते AC चे बिलच कमी होणार नाही, तर तुमच्या AC चे आयुष्यही वाढेल.


एकाच तापमानात एसी ठेवा


बर्‍याच अहवालांमध्ये असे समोर आले आहे की, एसीचे तापमान समान राहिले किंवा स्थिर राहिले तर वीज बिलावर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होतो. असे म्हणतात की, जर तुम्ही एका डिग्रीने तापमान वाढवलात तर विजेच्या बिलावर सुमारे 6 टक्के फरक पडतो.


तापमान 18 च्या जागी 24ठेवा


बरेच लोक उन्हाळा वाढल्यामुळे किंवा बाहेरुन घरी आल्यामुळे लोकांना खूप गरम होते आणि लोक मग AC चे तापमान 18 करतात. आणि त्यानंतर लोकं ते कमी जास्त करत असतात. परंतु अशा वेळेस AC चे तापमान 18 ऐवजी 24 वरच ठेवा. जरी तुम्हाला AC चालू केल्या केल्या थंड वाटत नसेल, परंतु काही वेळात तुमची खोली चांगली थंड होईल आणि तुमचे बिलही कमी येईल.


अधिक डिव्हाइस असल्यास ते काढा


बर्‍याच वेळा असे होते की, ज्या खोलीत AC बसवला आहे, त्यामध्ये आणखी बरीच इलेक्ट्रीक साधने देखील बसवलेली असतात. यामुळे देखील खोली थंड होण्यास वेळ लागतो आणि इलेक्ट्रीसीटी सुद्धा जास्त खेचली जाते. अशा परिस्थितीत, ज्या खोलीत AC चालू आहे त्या खोलीत फ्रीज ठेऊ नका, कारण त्यामुळे उष्णता अधिक वाढवते.


टाइमर वापरा


बरेच लोकं एसी रात्री चालू ठेऊन झोपतात. रात्री खोली थंड होते आणि लोकांना खूप थंडी वाजली तरीही झोपेमुळे उठून बंद करत नाहीत. यामुळे रात्रभर AC चालू राहतो. अशा परिस्थितीत आपण काही तासांसाठी AC टाईमर सेट करू शकता, काही तासांनंतर AC स्वतः बंद होईल. या सवयीमुळे आपले ACचे बिल बरेच कमी होईल.


फॅन आणि एसी एकत्र चालवा


जर तुम्ही कमीत कमी AC चालवू इच्छित असल्यास. अशा परिस्थितीत प्रथम थोड्या वेळासाठी एसी चालवा आणि नंतर कमी स्पीडमध्ये पंखे चालवा. म्हणजे एसीचा थंडपणा संपूर्ण खोलीत पसरेल आणि ते इतके थंड होईल की, काही वेळाने तुम्हाला AC बंद करावा लागेल. कमी ACचा वापर केल्यामुळे सुद्धा तुम्हाला कमी विज बिल येईल.