WhatsApp Tips And Tricks: जगातील सर्वात लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध मेसेजिंग अॅप्सपैकी एक WhatsApp. मात्र या अॅप्समध्ये iPhones आणि Android स्मार्टफोन्सवर शेअर केलेल्या फोटोंची गुणवत्ता 70% पर्यंत कमी करता येते असे मानले जाते. जेणेकरून ते फोटो, व्हिडिओ त्वरीत शेअर करता येतील. आज आम्ही तुम्हाला काही सोपे मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅपवर एचडी क्वालिटीमध्ये फोटो शेअर करू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअॅपवर एचडी गुणवत्तेत फोटो आणि व्हिडिओ पाठवा


WhatsApp वर फोटो आणि व्हिडिओ पाठवणे खूप सोपे आहे आणि लोक सहसा हे अॅप वापरतात. बऱ्याच काळापासून लोक त्यांच्या मीडिया फाइल्स WhatsApp ऐवजी मेल किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे फोटो, व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करतात. पण आता तुम्ही सहज व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन फोटो, व्हिडिओ एचडी क्वालिटीमध्ये पाठवू शकता.  


वाचा : थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरने प्रेयसीचे केले 35 तुकडे  


सेटिंग्जमध्ये हे बदल करा


Android आणि iOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आहे. याचा अवलंब करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्स अॅप ओपन करावे लागेल आणि त्यानंतर अॅपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. सेटिंग्जमध्ये तुम्हाला 'Storage and Data' हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर, तुमच्या स्क्रीनवर दिसणारा मेनू, 'मीडिया अपलोड गुणवत्ता' (Media Upload Quality) तळाशी दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला 'ऑटो' (Auto), बेस्ट क्वालिटी (Best Quality) आणि 'डेटा सेव्हर' (Data Saver) असे तीन पर्याय दिसतील. यातून तुम्ही 'बेस्ट क्वालिटी' (Best Quality) निवडल्यास तुम्ही शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ कॉम्प्रेस होणार नाहीत.