Google Pay Split an expense News In Marathi: अनेकदा आपण मित्रांसोबत बाहेर जेवायला जातो आणि पार्टीचे बिल ही प्रत्येक वेळी तुम्हालाचं भरावे लागते. तसेच पार्टीच्या बिलाचे विभाजन करुन ते बील भरणे ही थोडं कष्टीचेच काम आहे. मात्र आता यापासून तुमची सुटका होऊ शकते. कारण सध्या वापरलं जाणार पेमेंट अॅप Google Pay ने एक नवीन फीचर आणलंय आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्राकडून सहज पैसे वसूल करु शकता. यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलने गेल्या महिन्यात गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये नवीन फीचरची घोषणा केली होती. यामध्ये स्प्लिट एक्स्पेन्स हे असे वैशिष्ट्य आहे. Google Pay च्या स्प्लिट एक्स्पेन्समुळे तुम्ही तुमच्या मित्रांसह रक्कम विभाजित करू शकता. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी करत असाल आणि तुम्ही पूर्ण पैसे दिले असेल.तर Google Pay तुम्ही भरलेली बिले तुमच्या मित्रासोबत आपोआप शेअर करेल. 


असं करतं काम


SplitWise अॅप खर्च  मागोवा घेण्याच्या दृष्टीने थोडा चांगला अनुभव आणि वैशिष्ट्ये देते. Google Pay अॅपवरील पे पर्याय पहा. तुम्‍हा फक्‍त स्‍प्लिट व्‍यय फीचरवर टॅप करायचंय. अकाऊंट एंटर करायचं आणि इतरांना त्वरित पेमेंटची रिक्वेस्ट मिळेल.  ग्रुपमधील सर्व लोकांना वाट्याला जी काही रक्कम येईल, ती तुम्हाला Google Pay द्वारे पाठवले जातील. तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत आणि कोणाकडून जास्त पैसे मिळवायचे आहेत याची नोंद तुम्ही येथे ठेवू शकता. तुम्ही Splitwise वापरल्यास ते त्याच पद्धतीने काम करेल. तुम्ही स्प्लिटवाइज अॅपमध्येच संपूर्ण खर्च एकमेकांसोबत शेअर करू शकता.


गुगल पे स्प्लिट खर्च कसा वापरायचा?


  1.  प्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अॅप उघडा आणि “New payment” वर टॅप करा.

  2. अॅप तुम्हाला सर्च बार आणि स्क्रीनच्या वरच्या बाजूला रिकामा New Group पर्याय दाखवेल आणि तुम्हाला ते पेज दिसेल.

  3. त्यावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांची नाव टाका आणि Next वर क्लिक करा.

  4. आता तुम्हाला तुमच्या ग्रुपचं नावं टाकावं लागेल, त्यानंतर तुम्ही “Create” बटणावर टॅप करू शकता, त्यानंतर ग्रुप तयार होईल.

  5. आता तुमच्याकडे गुगल पे ग्रुप आहे, तुम्ही तुमच्या मित्रांसह बिले भरू शकता. यासाठी, फक्त “स्प्लिट अ एक्सपेन्स” बटणावर टॅप करणे आवश्यक आहे, आपण खर्च केलेली एकूण रक्कम प्रविष्ट करा आणि पुढील बटणावर पुन्हा टॅप करा.

  6.  मग Google आपोआप रक्कम विभाजित करेल आणि नंतर प्रत्येकाला विचारेल की ते किती खर्च करतील. तुम्ही send reques बटणावर टॅप करू शकता. पैसे कशासाठी आहेत हे सांगण्यासाठी तुम्हाला पर्यायी शब्द मिळेल. जेव्हा सदस्य पेमेंट करेल तेव्हा Google Pay तुम्हाला सूचित करेल आणि पेमेंट आलेख अपडेट करेल.