How To Stop Spam And Fraud Call: काळ जस जसा पुढे सरकत आहे तस तंत्रज्ञानातही माणूस प्रगती करत आहे. स्मार्टफोन आणि 4जी, 5जीच्या जगात माणूस अनेक नवीन अविष्कार करत आहे. आजच्या काळात मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळं बँकेचे व्यवहारही अगदी कमी वेळात केले जातात. पण मोबाईलमुळं काम सोप्पे झाले असले तरी तेवढीच आव्हाने देखील वाढले आहेत. सायबर क्राइम आणि सायबर चोरट्यांच्या सुळसुळाट झाला आहे. कधीकधी अनेकांना स्पॅम कॉल (Spam Call) आणि फ्रॉड कॉल (Fraud Call) येतात. सतत येणाऱ्या या कॉल्समुळं वैताग येतो. पण असे कॉल्स कसे बंद करावे, असा प्रश्न सगळ्यांना सतावत असतो. तर जाणून घेऊया असे फ्रॉड कॉल कसे बंद करावेत. (How To Block Spam And Fraud Call)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रॉड कॉल आणि स्मॅम कॉलमुळं अनेकदी लोकांची फसवणूक होत असल्याचेही समोर आले आहे. काही जण अशा कॉल्समुळं वाचण्यासाठी लोक फोन नंबरही बदलतात. मात्र तुम्ही नंबर न बदलताही काही टिप्स वापरून असे कॉल्स बंद करु शकतात. जाणून घ्या सविस्तर.


पहिली स्टेप


स्पॅम किंवा फ्रॉड कॉल्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये असलेले डु नॉट डिस्टर्ब म्हणजेच डीएनडीचा वापर करु शकता. त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला डीएनडीचा पर्याय ऑन करावा लागणार आहे. हा पर्याय ऑन करताच तुम्हाला फालतू फोन किंवा स्पॅम कॉल्स येणे काही अंशी कमी होणार आहेत. 


दुसरी स्टेप


तुमच्या नंबरवर जास्त प्रमाणात फ्रॉड कॉल्स येत असतील तर तुम्ही ते नंबर ब्लॉक करुन टाका. जेणेकरुन पुन्हा त्या नंबरवरुन सतत फोन येणार नाहीत. तसंच, स्पॅम नंबरवरुन येणाऱ्या फोन कॉलला कधीच उत्तर देऊ नका. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. 


तिसरी स्टेप


आजकाल स्मार्टफोनमध्ये एक इनबिल्ड फिचर देण्यात येते. 'कॉलर आयडी अँड स्पॅम'. हे फिचर ऑन केल्यानंतर कॉल आल्यास तो स्पॅम आहे की नाही हे कळू शकणार आहे. अशावेळी तुम्ही स्पॅम कॉल उचलणे टाळू शकणार आहेत. व तिथल्या तिथेच नंबर ब्लॉक करु शकणार आहात. हे फिचर गुगल फोन अॅपच्या माध्यमातून दिले जाते. 


हे फिचर या स्पॅम कॉल्सला ब्लॉक करते जे तुमच्या ओटीपीवर डिलिव्हर करण्यात येतात. अशातच तुम्हाला एखादा फ्रॉड कॉल आलाच तर हे अॅप त्याआधीच तो कॉल ब्लॉक करण्यात येतो.