मुंबई : आपल्यापैकी कोणीही जेव्हा नवीन मोबाईल विकत घेतो किंवा आपला मोबाईल बदलतो, तेव्हा बरेऱ्याचदा असे होते की, तुमचा आधीचा फोन  iOS असतो आणि तुम्हाला Android फोन वापरायचा असतो. अशा वेळीला लोकांना त्यांच्या फोन मधील डेटा विषेशता Contacts कसे ट्रांस्फर करायचे हा प्रश्न पडतो. परंतु आमच्याकडे याची माहिती आहे, जी नक्कीच तुमच्या फायद्याची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Google ड्राइव्ह द्वारे iOS वरून Android वर Contacts ट्रांसफर


-iOS वरून Androidमध्ये कॅनटॅक्ट नंबर ट्रांसफर करण्यासाठी, प्रथम iOS डिव्हाइसवर Google ड्राइव्ह डाउनलोड करा.


-आता आपल्या Google अकाउंटने लॉग इन करा. त्यानंतर हॅमबर्गर मेनूवर क्लिक करा आणि सेटिंग्ज वर जा आणि Backup Wizard उघडा.


-बॅकअपवर क्लिक करताच तुम्हाला Contacts, Calendar events,Photos आणि Videosचा पर्याय मिळेल.


-तुम्हाला सर्वकाही बॅकअप घ्यायचे असल्यास Start Backup वर क्लिक करा. जर, तुम्हाला फक्त  Contactsचा बॅकअप घ्यायचा असेल, तर अन्य सर्व पर्यायांची निवड रद्द करा.


-आता तुमचे कॅन्टॅक्स Google ड्राइव्ह मध्ये येतील.


-नंतर आपण iOS मध्ये सुरु केलेले  Google अकाउंट  Android डिव्हाइसवर लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व  Contacts सापडतील.


तुम्ही iOS वरून Android वर कॅन्टॅक्स ट्रांस्फर करण्यासाठी Gmail देखील वापरू शकता.


-यासाठी, iOS डिव्हाइसच्या सेटिंग्जवर जा आणि Mail वर क्लिक केल्यानंतर Account वर क्लिक करा


-त्यानंतर Gmail वर क्लिक करा आणि  Contacts Toggle चालू करा.


-आपले Contacts आपल्या Google खात्यासह Sync केले जातील.


-आता Android डिव्हाइसवर देखील त्याच खात्यासह लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला  Contacts दिसतील.


iCloud वापकरुन  Contacts ट्रान्सफर


-iOS डिव्हाइसमधील Settings वर जा आणि आपल्या प्रोफाइलवर क्लिक करा.


-यानंतर iCloud वर क्लिक करा.  Contacts Toggle चालू असल्याचे सुनिश्चित करा.


-आता खाली स्क्रोल करा आणि iCloud Backup वर क्लिक करा.


-मग Back Up Now वर क्लिक केल्यानंतर बॅकअप पूर्ण होईपर्यंत थांबा.


-आता अँड्रॉइड डिव्हाइसवर ब्राउझर उघडा, URlमध्ये icloud.com प्रविष्ट करा आणि आपल्या Apple ID सह लॉग इन करा.


-Chrome मध्ये दिलेल्या तीन डॉट मेनूवर क्लिक करून Desktop Mode वर स्विच करा.


-लॉग इन केल्यानंतर Contactsवर क्लिक करा.


-त्यानंतर Gear Settings Icon वर क्लिक करा आणि Select Allवर क्लिक करा.


-आता पुन्हा Gear Settings वर क्लिक करा आणि Export VCard निवडा.


-आपल्या  Contactsची एक VCY file फाइल डाऊनलोड केली जाईल, ते उघडा.


-आता तुम्हाला Contacts सेव्ह करण्याचा पर्याय मिळेल. त्यात फोन सिलेक्टकरा त्यानंतर Contacts फोनमध्ये सेव्ह होतील.