Use WhatsApp Without Internet : सध्याच्या जगात आपण WhatsApp च्या आहारी गेलो आहोत असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. अनेकांच्या दिवसाची सुरुवात whatsapp च्या गुड मॉर्निंग पासून आणि शेवट watasapp वरील गुड नाईटने होतो. अशात अचानक काही झालं आणि WhatsApp बंद झालं तर आपला जीव कासावीस होतो. अशात तुमचं WhatsApp विना मोबाईल इंटरनेट कसं चालवायचं याची ट्रीक समजली तर? सोन्याहून पिवळं नाही का? जा बातमीतून आम्ही तुम्हाला विना मोबाईल इंटरनेट WhatsApp कसं वापरायचं याची ट्रीक सांगणार आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे ही ट्रीक अतिशय सोपी आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Steps : 


1. कसा कराल वापर 


जर तुम्हाला बिना मोबाईल Whats App वपरायचं असल्याच तुम्हाला डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची गरज लागेल. 


2. तीन डॉट्सवर करा क्लिक 


सर्वात आधी तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवरून WhatsApp सुरु करा. त्यानंतर सर्वात वर दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला 'लिंक्ड डिव्हाईस' ऑप्शनवर टॅप करावं लागेल. यानंतर मल्टी डिव्हाईस बीटा ऑप्शनवर क्लिक करा. 


3. करा मल्टी डिव्हाईस कनेक्टिव्हीटी   


यामध्ये सर्वात खाली तुम्हाला जॉईन बीटा (Join beta) लिहिलेलं बटण दिसेल. यावर क्लिक करावं लागेल. या ऑप्शनसाठी बीटा व्हर्जन जॉईन करावं लागेल. यनानंतर तुम्हाला बॅक जावं लागेल. बॅक केल्यावर तुम्हाला मल्टी डिव्हाईस बीटा कन्फर्मेशन मिळेल. यानंतर तुम्ही चार डिव्हाईस लिंक करू शकतात. 


4.  या स्टेप्स फॉलो करा 


वरील प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून https://web.whatsapp.com/ वर क्लिक करावं लागेल. यानंतर मोबाईलवर मेन्यू ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर स्टेप 1 आणि स्टेप  2 कराव्या लागतील. यानंतर स्टेप नंबर 3 पूर्ण झाल्यानंतर लिंक्ड डिव्हाईसवर क्लिक करावं लागेल. 


5. असं करा विना इंटरनेट WhatsAppचा वापर 


यानंतर तुम्ही लिंक डिव्हाईस या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर https://web.whatsapp.com/ वरील एक QR कोड स्कॅन करावा लागेल. QR स्कॅन केल्यानंतर तुमचं whatsapp डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर लॉगिन होईल. एकदा तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर whatsapp सुरु झाल्यास तुमच्या मोबाईलचं इंटरनेट वापरलं जाणार नाही. याच स्टेसीप्स फॉलो करून तुम्ही अँड्रॉइड आणि आयफोनवरही ही सुविधा वापरू शकतात. 


how to use whatsapp without using mobile internet read step by step process