`हुवावे`चा नवीन स्मार्टफोन `ऑनर १० लाइट` बाजारात दाखल
रिलायंन्स जिओच्या ग्राहकांसाठी आकर्षक अशी ऑफर देणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबई: चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी 'हुवावे'ने नवा स्मार्टफोन 'ऑनर १० लाइट' भारतात लॉन्च केला आहे. याआधी 'ऑनर लाइट १०' स्मार्टफोनला चीनमध्ये लॉन्च करण्यात आले होते. हा स्मार्टफोन स्काय ब्ल्यू, मि़डनाइट ब्लॅक, सफायर ब्ल्यू या तीन रंगात उपलब्ध असणार आहे. ऑनरने मागील वर्षात ऑनर ९ लाइट हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. ग्राहक 'फ्लिपकार्ट' किंवा 'ऑनर इंडिया स्टोअर' मधून या स्मार्टफोनची खरेदी करु शकतात.
'ऑनर १० लाइट' स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
कंपनीने ऑनर १० स्मार्टफोनची घोषणा नोव्हेंबर २०१८ मध्ये केली होती. स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल तर सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सल आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये २४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले ६.२१ इंच आहे. स्मार्टफोनची स्टोअरेज ६४ जीबी आहे. तसेच मायक्रोएसडीच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. फोनची बॅटरी ३ हजार ४०० एमएएच आहे.
स्मार्टफोनची किंमत
'ऑनर १० लाइट' स्मार्टफोनची किंमत (४ जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोअरेज) १३ हजार ९९९ रुपये आहे. तसेच (६ जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोअरेज) स्मार्टफोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री २० जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरु करण्यात येणार आहे. कंपनीने रिलायंन्स जिओच्या ग्राहकांसाठी आकर्षक अशी ऑफर देणार असल्याचे सांगितले आहे.