`ही` कंपनी आणतेय 40 MP कॅमेऱ्याचा स्मार्टफोन
चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
मुंबई : टेक्नोलॉजीसोबत स्मार्टफोनचे कॅमेराही चांगले होत चालले आहेत. सध्याच्या काळात स्मार्टफोन्समध्ये ड्युअल लेंस असलेल्या कॅमेराचा ट्रेंड सुरु झाला आहे. चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Huawei चा नवा स्मार्टफोन
Huawei कंपनी लवकरच आपला एक जबरदस्त स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन लेंस असलेला 40 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे.
Huawei च्या Next Gen P-सीरिज संदर्भात काही ठराविक माहिती समोर आली आहे. पाहूयात काय आहे ही खास माहिती...
40 मेगापिक्सल कॅमेरा
कंपनी येत्या काळात आपल्या P- सीरिज स्मार्टफोन्सच्या जाहिराती ऑनलाईन पहायला मिळाले आहेत. या जाहिरातींमध्ये फोनमध्ये तीन लेंस असलेला 40 मेगापिक्सल कॅमेरा, 5X हायब्रिड झुमिंग आणि 24 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असल्याची माहिती समोर आली आहे.
कॅमेऱ्यासाठी Leicaची मदत
Huawei ने या स्मार्टफोनसाठी कॅमेऱ्यांची कंपनी Leicaची मदतही घेतली आहे. या कंपनीने Huawei P10 आणि Huawei Mate 10 च्या कॅमेऱ्यावर काम केलं आहे.
या नव्या स्मार्टफोनचं नाव Huawei P11 असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या Huawei P10 स्मार्टफोनमध्ये ड्युअल लेंस (20 मेगापिक्ल + 12 मेगापिक्सल) रियर आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता.