धडक लागण्यापूर्वीच सूचना देणारी Hyundai Tucson एसयूव्ही लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
ह्युंदाईची नवीन टक्सॉन गाडी जीप कंपास, सिट्रोएन सी5 एअरक्रॉस आणि फोक्सवॅगन टिगुआन सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.
Hyundai Tucson Price and Features: गेल्या काही दिवसांपासून कारप्रेमी ज्या गाडीची आतुरतेने वाट पाहात होते, ती प्रतीक्षा संपली आहे. ह्युंदाईने भारतात प्रीमियम एसयूव्ही टस्कॉन लाँच केली आहे. या गाडीची किंमत 27.7 लाख (एक्स शोरूम) पासून सुरु होते. इतर व्हेरियंटची किंमत अजूनही जाहीर केली नाही. एसयूव्हीचं चौथं जनरेशन मॉडेल आहे. विशेष बाब म्हणजे ही एसयूव्ही एडीएएस लेव्हल 2 फीचर्ससह आणली आहे. या फीचरमुळे कार एखाद्या ठिकाणी ठोकण्यापूर्वी इशारा देईल. एसयूव्ही प्लॅटिनम आणि सिग्नेचर अशा दोन ट्रिममध्ये आणली आहे. नवीन टक्सॉन ही गाडी जीप कंपास, सिट्रोएन सी5 एअरक्रॉस आणि फोक्सवॅगन टिगुआन सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.
भारतात एडीएएस लेव्हल 2 फीचर्ससह लाँच केलेलं ह्युंदाईचं पहिलं वाहन आहे. एडीएएस लेव्हल 2 मध्ये, तुम्हाला फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, लेन कीप असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट सारखी वैशिष्ट्ये मिळतील. यामुळे एडीएएस वैशिष्ट्ये असलेली नवीन टस्कॉन या विभागातील एकमेव एसयूव्ही आहे. इतर सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सहा एअरबॅग्ज, पुढे आणि मागे पार्किंग सेन्सर्स, ईएससी, हिल-डिसेंट कंट्रोल आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स यांचा समावेश आहे. नवीन ह्युंदाई टक्सॉनमध्ये 2.0-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह येते. 2.0 लिटर चार सिलेंडर इंजिन 156hp पॉवर आणि 192Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. दुसरे 2.0-लिटर डिझेल इंजिन 186hp आणि 416Nm टॉर्क निर्माण करते, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन ह्युंदाई टक्सॉनला एलईडी हेडलाइटसह मोठी ग्रिल दिली आहे. त्याचे डीआरएलचं ग्रिलमध्येच इंटिग्रेटेड केलेलं आहे. मागील बाजूस अद्ययावत एलईडी टेललाइट्स देण्यात आल्या आहेत. त्यांना एलईडी बारद्वारे जोडण्यात आले आहे. याशिवाय शार्क फिन अँटेना आणि पॅनोरामिक सनरूफचीही खासियत आहे.