Hyundai Exter Booking in india: दक्षिण कोरियामधील कार कंपनी Hyundai ने भारतीय बाजारपेठेत आपली नवी कोरी एसयुव्ही आणण्याची तयारी केली आहे. दरम्यान कार लाँच करण्यााधीच कंपनीने Hyundai SUV Exter साठी बुकिंग सुरु केलं आहे. Hyundai ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर कार बुकिंगची माहिती दिली आहे. फक्त 11 हजारांच्या टोकनवर तुम्ही ही कार बूक करु शकता असं कंपनीने सांगितलं आहे. याआधी कंपनीने एसयुव्हीचं डिझाइन समोर आणलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hyundai ने आपली नवी SUV Exter लाँच करण्याआधीच बुकिंग सुरु केलं आहे. ही एक मायक्रो एसयुव्ही असून टाटाची दमदार आणि प्रसिद्ध Punch ला तगडी स्पर्धा देण्याची शक्यता आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फक्त 11 हजार रुपयांत ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये डीलरशीपच्या माध्यमातून बूक करु शकता. त्यामुळे जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Hyundai SUV Exter च्या निमित्ताने चांगली संधी आहे.  


नवीन एसयूव्ही कंपनी तीन पॉवरट्रेनच्या पर्यायासह आणणार आहे. 1.2 लीटरचं कप्पा पेट्रोल इंजिन (E20 Fuel Ready) 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि स्मार्ट ऑटो AMT (ऑटोमेटेड मैनुअल ट्रांसमिशन) सह इथेनॉल-20 अनुरूप असेल. याशिवाय, एसयूव्ही सीएनजी व्हेरियंटमध्येही आणली जाणार आहे. यात 1.2-लिटर Bi-fuel Kappa petrol आणि CNG इंजिनसह पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल.



कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही कार एकूण पाच पर्यायात उपलब्ध असेल. यामध्ये EX, S, SX, SX(O) आणि SX(O) कनेक्ट यांचा समावेश आहे. तसंच एसयुव्ही 6 मोनोटोन आणि 3 ड्यूएल टोन एक्स्टिरियर रंगांच्या पर्यायात येणार आहे. यामध्ये कॉस्मिक ब्ल्यू आणि रेंजर खाकीसारख्या रंगांचा समावेश आहे. 


दरम्यान कंपनीने अद्याप या कारची किंमत किती असेल याचा खुलासा केलेला नाही. पण एंट्री लेव्हल SUV असल्याने या कारची किंमत 6 ते 10 लाखात असेल असा अंदाज आहे. याचवर्षी जून किंवा जूननंतर ही कार लाँच केली जाण्याची शक्यता आहे. 


कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, Hyundai Exter मध्ये S सिग्नेचर असणारी एलईडी डीआरएल, डायमंड कट अलॉय व्हील्ससारखे फीचर्स मिळतील. यासोबतच 10-इंचाचा इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, अॅम्बियंट लाइट, सनरूफ, रियर एसी व्हेंट्स, एबीएस, ईबीडी, एअरबॅग्ज, एचएसए आणि टीपीएमएस सारखे फीचर्सही दिले जाऊ शकतात.