Auto Expo 2023 मध्ये ह्युंदाईची इलेक्ट्रिक गाडी IONIQ5 ची धूम, जाणून घ्या किंमत
Hyundai IONIQ5 Launch: ऑटो एक्स्पो 2023 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली असून एकापेक्षा एक सरस गाड्या सादर केल्या जात आहे. ह्युंदाईनंही आपली जबरदस्त इलेक्ट्रिक गाडी IONIQ5 लाँच केली आहे. कंपनीचा ब्रँड अॅम्बेसडर असलेल्या अभिनेता शाहरुख खान हस्ते या इलेक्ट्रिक गाडीचं सादरीकरण करण्यात आलं.
Auto Expo 2023 Hyundai IONIQ5 Launch: ऑटो एक्स्पो 2023 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली असून एकापेक्षा एक सरस गाड्या सादर केल्या जात आहे. ह्युंदाईनंही आपली जबरदस्त इलेक्ट्रिक गाडी IONIQ5 लाँच केली आहे. कंपनीचा ब्रँड अॅम्बेसडर असलेल्या अभिनेता शाहरुख खान हस्ते या इलेक्ट्रिक गाडीचं सादरीकरण करण्यात आलं. ही गाडी फुल चार्जवर 631 किमी रेंज देते, असा दावा करण्यात आला असून ARAI प्रमाणिकृत आहे. विशेष म्हणजे, या गाडीनं 2022 या वर्षातील वर्ल्ड डिझाईन ऑफ द ईयर, वर्ल्ड इलेक्ट्रिक कार ऑफ द ईयर आणि 2022 वर्ल्ड कार ऑफ द ईयर अवॉर्ड जिंकले आहेत. कंपनीने पहिल्या 500 ग्राहकांसाठी या गाडीची किमंक 44.95 लाख रुपये इतकी ठेवली आहे. या गाडीचं बुकिंग लाँचिंगपूर्वीच सुरु करण्यात आलं होतं. तुम्हाला ही गाडी बूक करायची असल्यास 1 लाख रुपये आगाऊ रक्कम भरावी लागेल. ही गाडी ग्रॅव्हिटी गोल्ड मॅट, ऑप्टिक व्हाईट आणि मिडनाईट ब्लॅक पर्लमध्ये उपलब्ध असेल.
Hyundai IONIQ5 खासियत
IONIQ5 मध्ये रेट्रो लूक असून शार्प लाइन्स, फ्लॅट सरफेस आणि एसयूव्ही-ish स्टांस आहे. त्याचबरोबर हाय रेक्ड विंडस्क्रीन आहे. हेडलाइट्स आणि टेल-लाइट्समध्ये यूनिक पिक्सेलेटेड लूक दिला आहे. या गाडीला 20 इंचांची चाकं असून तसेच चाकांमध्ये टर्बानसारखी डिझाईन दिली आहे. ही गाडी 7.6 सेकंदात 0-100 वेग धारण करु शकते. छताखालील इंटिरिअर सपाट असून लवचिक आसन आणि मुव्हेबल सेंटर कन्सोल आहे. आतल्या भागात रिसायक्लेबल प्लास्टिक आणि इको-फ्रेंडली लेदर फॅब्रिकचा वापर केला आहे. गाडीत इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टचस्क्रीन, ADAS तंत्रज्ञानासह हेड-अप डिस्प्लेसाठी 12.3-इंच स्क्रीन मिळते. याव्यतिरिक्त, ते 3.6kW च्या आउटपुटसह व्हीकल-टू-लोड फंक्शन दिलं आहे.
बातमी वाचा- ऑटो एक्स्पोमध्ये Maruti Suzuki eVX SUV ची पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्ये
IONIQ5 या इलेक्ट्रिक गाडीसाठी 72.6 किलोवॅट क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 631 किमी रेंज देते. इलेक्ट्रिक मोटर 217 एचपी आणि 350 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच 800v चार्जिंगला सपोर्ट करण्यास सक्षम आहे. फक्त 18 मिनिटात बॅटरी 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते, असा दावा करण्यात आला आहे.