नवी दिल्‍ली : ह्युंदाईची भारतात सर्वात जास्त विकली जाणा-या ग्रॅन्ड आय१० कारचा आणखी जबरदस्त अवतार लॉन्च करण्यात आलाय. कंपनीने भारतात ग्रॅन्ड आय१० ड्युअल टोन एडिशन लॉन्च केलंय. ड्युअल टोन एडिशनला ग्रॅन्ड आय१० च्या स्फोर्ट्स व्हेरिएंटवर तयार करण्यात आलंय. 


किती आहे किंमत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या ग्रॅन्ड आय१० स्फोर्ट्स पेट्रोल कारची किंमत ५.९९ लाख रूपयांपासून सुरू होते. तर ड्युअल टोनची किंमत ६.२४ लाख रूपयांपासून सुरु होते. त्यासोबतच डीझल व्हर्जनबाबत सांगायचं तर याची किंमत ७.०२ लाख रूपये आहे. तर ड्युअल टोन कारसाठी तुम्हाला ७.२३ लाख रूपये खर्च करावे लागतील. याच्या इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. 


कारची खासियत...


या कारची खासियत या कारच्या नावातच दडली आहे. म्हणजे ही कार ड्युल टोनसोबत सादर करण्यात आली आहे. यात ऑल ब्लॅक डॅशबोर्डसोबत फॅब्रिक अपहोल्स्ट्री देण्यात आलीये. यावर रेड कॉन्स्ट्रास्त स्टिचिंग केली गेली आहे. यासोबतच गिअर शिफ्ट नोब आणि लेदर असलेलं स्टीअरींग व्हीलवर रेड हायलायटर सुद्धा याला अधिक आकर्षक बनवतात. तसेच, यात एबीएस, अलॉय व्हील आणि लेदर असलेला स्टीअरींग व्हील देण्यात आलंय.