मुंबई : ह्युंडाई मोटर इंडियाच्या वेगवेगळ्या मॉडेल्सचे दर जून महिन्यापासून 2 टक्के वाढणार आहेत. मात्र कंपनीने सांगितल्याप्रमाणे नुकतीच लाँच झालेली एसयूवी क्रेटा या गाडीचे दर वाढणार नाहीत. उत्पादनातील गोष्टींचा दर वाढल्यामुळे गाड्यांची किंमत वाढली असल्याच सांगितलं आहे. आता ह्युंडाई एन्ट्री लेव्हलच्या इयॉन ते एसयूवी टुस्कॉन या कार विकत आहे. इयॉनची दिल्ली शोरूममधील किंमत ही 3.3 लाख रुपये असून टुस्कॉनची किंमत 25.44 लाख रुपये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का वाढणार नाही या कारची किंमत एचएमआयएलचे मार्केटिंग हेड राकेश श्रीवास्तव यांनी सांगितल्याप्रमाणे, आम्ही आतापर्यंत काही गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. कारण आतापर्यंत आम्हाला जो खर्च सांभाळता आला तो करत होतो. मात्र आता आम्ही काही ताण हा ग्राहकांवर टाकत आहोत. जूनपासून आम्ही आमच्या कारच्या किंमतीत 2 टक्के वाढ करत आहे. कंपनीने सांगितलं की, एसयूवी क्रेटाच्या 2018 या मॉडेलची किंमत मात्र वाढणार नाही. 


यामुळे वाढणार किंमत 


ह्युंडाईने क्रेटा एसयूवीला सोमवारी लाँच करण्यात आलं. दिल्लीत या कारची एक्स शोरूम किंमत 9.44 ते 15.03 लाख रुपये आहेय ही क्रेटाची अपडेटेड वेरिएंट आहे. क्रेटाच्या नव्या वेरिएंटमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ,6 - वे पावर ड्रायइवर सीट, क्रूज कंट्रोल आणि वायलेस फोन चार्जिंगसोबत अनेक फिचर्स उपलब्ध आहे. याप्रकारे 2 टक्के वाढ करून या कारची किंमत ही 7 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. 


लाँचिंगच्या वेळी ह्युंडाईने मॅनेझिंग डायरेक्टर आणि सीईओ वाई के कू यांनी सांगितले की, 2015 मध्ये क्रेटा सादर झाल्यानंतर एसयूवी एक ब्रँड बनली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की क्रेटा या कारने आपली नवी जागा निर्माण केली आहे. क्रेटाच्या पेट्रोल वेरिएंटने दिल्लीमध्ये एक्स शोरूमची किंमत 9.43 लाख ते 13.59 लाख रुपयांपर्यंत आहे. डिझेल वेरिएंट 9.99 लाख ते 15.03 लाख रुपये आहे.