2022 Hyundai Tucson SUV: ह्युंदाई मोटार आपली अपडेटेड Tucson फेसलिफ्ट एसयूव्ही 10 ऑगस्टला लाँच करणार आहे. कंपनीने 50 हजारात गाडी बुक करण्याचा पर्याय दिला आहे. या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या गाडीतील फीचरबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड कुतुहूल आहे. ही ह्युंदाईची पहिली एसयूव्ही आहे जी भारतातील लेव्हल 2 ADAS समर्थित असेल. यात ऑटोमेटेड सेंसिंग टेक्नोलॉजी असून कोणतंही ऑब्जेक्ट शोधण्यास सक्षम आहे. या गाडीत कॅमेरा आणि रडार सेंसर दिले आहेत. कठीण परिस्थितीत ही कार स्वतःच ब्रेक लावू शकते.  ही गाडी प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमधील Citroen C5 Aircross सारख्या गाडीशी स्पर्धा करेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन पिढीची Hyundai Tucson नवीन लुकसह अद्ययावत करण्यात आली आहे. एसयूव्हीमध्ये एलईडी हेडलाइटसह मोठी ग्रिल आहे. हेडलाइट अशा प्रकारे ठेवला आहे की तो ग्रिलचा भाग असल्याचे दिसते. एलईडी फॉग लँप खाली दिलेत. त्याचबरोबर एसयूव्हीच्या मागील बाजूस अद्ययावत एलईडी टेललाइट्स देण्यात आल्या आहेत.


या गाडीत दोन इंजिन पर्याय आहेत. 2.0-लिटर पेट्रोल आणि 2.0-लिटर डिझेल इंजिन पर्याय आहेत. पेट्रोल इंजिन सहा-स्पीड ऑटोमॅटिक आणि डिझेल इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. पेट्रोल इंजिन 156 पीएसची कमाल आउटपुट देते, तर डिझेल इंजिन 186 पीएस पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे.


इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.1-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले दिला आहे. अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, कीलेस एंट्री आणि ऑटो डिमिंग ORVM सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. नवीन टक्सनची किंमत 25 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. डिझेल इंजिन असलेल्या Tucson ची किंमत ₹ 30 लाखांच्या आत असू शकते.