नवी दिल्ली : आयडिया आणि वोडाफोन यांचं विलीनीकरणं अंतिम टप्प्यात असतानाच आयडिया कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवा प्लान लॉन्च केला आहे. कंपनीने हा प्लान 149 रुपयांत लॉन्च केला आहे. हा एक वॉईस टेरिफ प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. आयडिया कंपनीचा हा प्लान एअरटेल आणि बीएसएनएलच्या प्लान्सला टक्कर देणार आहे.


असा आहे आयडियाचा 149 रुपयांचा प्लान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयडियाच्या या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच 100 SMS प्रति दिन मिळणार आहेत. या श्रेणीत बीएसएनएल 99 रुपयांत 28 दिवसांची वैधता असलेला कॉलिंग प्लान देतो. आयडियाच्या या प्लानमध्ये लोकल, नॅशनल आणि रोमिंग कॉल्स फ्री मिळणार आहेत. मात्र, कंपनीने या प्लानमध्ये वॉईस कॉलिंगची सीमा ठेवली आहे. यानुसार 250 मिनिट प्रति दिवस आणि 1000 मिनिट प्रति आठवड्याची सीमा आहे.


यासोबतच वैधता असेपर्यंत 100 युनिक नंबर्सवरही कॉलिंग केलं जाऊ शकतं. सध्या हा प्लान काही सर्कल्समध्येच सुरु करण्यात आला आहे. तर, येत्या काळात इतरही सर्कलमध्ये हा प्लान सुरु करण्यात येईल.


हा एक वॉईस कॉलिंग प्लान असल्याने यामध्ये डेटा बेनेफिट्स मिळणार नाही. जर ग्राहकांना डेटा आवश्यक असेल तर त्यांना इंटरनेट डेटासाठी वेगळं रिचार्ज करावं लागणार आहे. यासोबतच 92 रुपयांचा प्लानही आहे जो 7 दिवसांसाठी 6GB डेटा देतो. आयडियाचा 199 रुपयांचा प्लानही उपलब्ध असून यामध्ये 1.4Gb डेटा प्रति दिन आणि 100 SMS प्रति दिन मिळणार आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे.


एअरटेल आणि बीएसएनएलला टक्कर


एअरटेल 299 रुपयांत फ्री वॉईस कॉलिंग प्लान देत आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स, 100 SMS प्रति दिन, 45 दिवसांची वैधता देतं. तर, BSNL चा 319 रुपयांचाही प्लान आहे ज्याची वैधता 90 दिवसांची असून यामध्ये अनलिमिटेड कॉल्स, 100 SMS ची सुविधा आहे. या प्लानमध्ये 2.4GB डेटा प्रति दिन मिळत आहे.