नवी दिल्ली : टेलिकॉम मार्केटमध्ये रिलान्यस जिओ लॉन्च झाल्यापासून सर्व कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त प्लॅन लॉन्च केले. गेल्या काही दिवसांपासून एअरटेल, वोडाफोन आणि बीएसएनएल ने जिओ ग्राहकांना आव्हान देण्यासाठी स्वस्त प्लॅन्स सादर केले. मात्र आता या स्पर्धेत आयडियानेही धमाकेदार एंट्री घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयडियाचा हा प्लॅन सर्वात जास्त कॅशबॅक असणारा प्लॅन आहे. यापूर्वी जिओच्या एका कॅशबॅक प्लॅनमध्ये सुमारे २५९९ रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याचा दावा केला जात आहे.


असे करा रिजार्च


आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी मॅजिक कॅशबॅक ऑफर सादर केली आहे. तुम्ही जर आयडिया ग्राहक असला आणि तुम्हाला या प्लॅनचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिचार्ज करा. ही ऑफर ३९८ रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. ३९८ पेक्षा अधिक रुपयांचा रिचार्ज केल्यास ३,३०० रुपयांचा फायदा मिळेल. आयडिया युजर्सला ही रक्कम कॅशबॅकच्या माध्यमातून परत मिळेल.


२७०० रुपयांचे शॉपिंग व्हाऊचर


तुम्ही जर ३९८ रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला ४०० रुपयांचे कॅशबॅक व्हाऊचर मिळेल. यासाठी तुम्हाला ५० रुपयांचे ८ व्हाऊचर मिळतील. डिस्काऊंट व्हाऊचरला ग्राहक एका वर्षाच्या दरम्यान ३०० हुन अधिक रुपयांचे रिचार्ज करण्यासाठी वापरले जाईल. याबरोबरच आयडिया युजर्संना २,७०० रुपये किंमतीचे शॉपिंग कूपन दिले जातील. हे कूपन तुम्ही आयडियाच्या वेबसाईटवर शॉपिंगसाठी वापरू शकता. 


ऑफर १० फेब्रुवारीपर्यंत


जर तुम्ही माय आयडिया अॅप किंवा आयडियाच्या वेबसाईटवरून रिचार्ज केल्यास तुम्हाला २०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिेळेल. या कॅशबॅकची एकूण किंमत ३३०० रुपये असेल. या ऑफरची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१८ आहे आणि ही ऑफर सर्व आयडिया प्रिपेड ग्राहकांसाठी आहे.


हा आहे प्लॅन


आयडियाचे ३९८ रुपयांचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉलिंग (एसटीडी व नॅशनल रोमिंग) सहीत मिळेल. दररोज  1 GB डेटा आणि १०० एसएमएस दिले जातील. या पॅकची व्हॅलिटीडी ७० दिवसांची आहे. यापूर्वी जियो ने असा कॅशबॅक प्लॅन सादर केला होता. या ऑफरमधून जिओ प्राईम ग्राहकांना ३९९ रुपये किंवा त्याहुन अधिक रुपयांच्या रिचार्जवर २,५९९ रुपयांचा फायदा मिळत होता.