AC Tips And tricks : आजकाल जवळपास 90 टक्के लोकांच्या घरी हा एसी ( Air Conditioner ) असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत एसी हा प्रत्येकासाठी जणू वरदानच ठरतो. इतकंच काय काहींना इतकी सवय असते की, थंडीच्या दिवसांत देखील त्यांना एसी हवा असतो. पावसाळ्यात हवेतील आर्द्रता खूप जास्त असते आणि एसी कोरडी हवा देतो, त्यामुळे खूप आराम मिळतो. मात्र अनेकदा AC मधून पाण्याचे थेंब पडतात. याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो खरं, मात्र ही खूर गंभीर समस्या ठरू शकते. पावसाळ्यात ही समस्या अधिक असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यपणे अनेकवेळा असं घडतं की, जेव्हा तुम्ही एसी सुरु करता तेव्हा काही वेळात पाण्याचे थेंब ( Water drops ) गळू लागतात. जर तुम्ही योग्य पद्धतीने नोटीस केलं तर रात्रीच्या वेळेस पाणी अधिक प्रमाणात गळू लागतं. आपल्यापैकी बरेच जणं याकडे दुर्लक्ष करतात, परंतु जर ही समस्या दीर्घकाळ राहिली तर मोठी समस्या उद्भवू शकते. 


हवामानाच्या तापमानातील फरकामुळे एसीमधून पाण्याचे थेंब ( Water drops ) गळू लागतात. पावसाळ्यात ज्यावेळी वातावरणात जास्त आर्द्रता असते, तेव्हा काही पाण्याचे थेंब पडणं हे सामान्य असू शकतं. पण जर एसीमधून जास्त प्रमाणात पाणी येत असेल तर ती एक समस्या असू शकते. 


एसीच्या इनडोर यूनिटमधून पाणी गळण्यामागे कारणं असतात ही जाणून घेऊया. 


एसीच्या फिल्टरकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे


प्रत्येक एसीमध्ये फिल्टर हे बसवलेले असतात. हे फिल्टर एसीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. जर तुम्ही फिल्टरची काळजी न घेतल्यास एसी खराब होण्याची शक्यता असते. एसीच्या इनडोअर युनिटमधून पाणी येत असेल तर याचा संबंधही फिल्टरशी असतो. हवा फक्त एसी फिल्टरमधून जाते, त्यामुळे एसी फिल्टरही लवकर घाण होतात. हवेच्या प्रवाहाने बाष्पीभवन कॉइलपर्यंत थंडी पोहोचू शकत नाही आणि कॉईल गोठतं.


फिल्टरची साफसफाई ठेवणं गरजेचं


ज्यावेळी एसी चालू असतो आणि गोठलेलं पाणी वितळण्याची वेळ येते तेव्हा युनिटमधून पाण्याचे थेंब बाहेर येऊ पडतता. तुम्हालाही पावसाळ्यात अशी समस्या येत असेल तर प्रथम एसी फिल्टर तपासा. त्यामध्ये जर घाण साचली असेल तर लगेच स्वच्छ करा. 


एसी नवीन असल्यावर पाणी गळत असेल तर


अनेकदा नवीन एसी मधून देखील पाणी गळण्याची समस्या दिसून येते. जर तुमचा एसी नवीन असेल आणि पहिल्या दिवसापासून युनिटमधून पाणी येत असेल तर याचा अर्थ असा की तो व्यवस्थित बसवला गेला नाही.